अँटी कोरोना औषध 11-12 मे पासून बाजारात मिळेल

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/89837*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

155

अँटी कोरोना औषध 11-12 मे पासून बाजारात मिळेल

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली-देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यातच लस, औषधे, ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत आहे. अशा वेळेस डीआरडीओने कोरोनावर बनलेल्या 2-डीजी या औषधाच्या वापरला आपत्कालीन परवानगी दिली आहे. आता हे औषध 11-12 मे पासून बाजारात उपलब्ध होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनी दिली. रेड्डी म्हणाले की, सुरुवातीला या औषधाचे कमीतकमी दहा हजार डोसेस बाजारात येऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रुग्णांनी हे औषध घ्यावे. डीआरडिओ आणि डॉ. रेडीज लॅबद्वारे तयार केल्या जाणाऱ्या या औषधाला औषध महानियंत्रकाकडून मंजुरी मिळाली आहे. या औषधच्या डोसनंतर ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला 2 ते 3 दिवसांमध्ये ऑक्सिजन सपोर्टवरून काढता येईल. ते लवकरच बरे होतील. हे औषध लवकरच रुग्णालयांमध्ये उपलब्ध होईल. दरम्यान, कालच डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस आणि हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरिटरीजच्या सहकार्याने बनवण्यात आलेल्या 2- डीजी या कोरोना प्रतिबंधक औषधाला केंद्र सरकारच्या ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया या विभागाने मंजुरी दिली होती.