Home आंतरराष्ट्रीय 5 जी मोबाईल तंत्रज्ञान चाचणीचा कोरोना मृत्युंशी काहीच संबंध नाही

5 जी मोबाईल तंत्रज्ञान चाचणीचा कोरोना मृत्युंशी काहीच संबंध नाही

0
5 जी मोबाईल तंत्रज्ञान चाचणीचा कोरोना मृत्युंशी काहीच संबंध नाही

5 जी मोबाईल तंत्रज्ञान चाचणीचा कोरोना मृत्युंशी काहीच संबंध नाही

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – देशातील 5 जी मोबाईल तंत्रज्ञान चाचण्यांमधील रेडिएशन कोरोना महामारीतील रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत आहे, अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडिया आणि काही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत आहेत. मात्र त्या अफवा असून 5 जी चाचण्यांचा आणि कोरोनाच्या मृत्युंचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिले आहे. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी पत्रकात केले आहे.
मोबाईलच्या 5 जी सेवेचा वापर जगातील अनेक देशांमध्ये केला जात आहे. त्यांना तेथे कोणताही त्रास झाल्याचे अजून तरी आढळलेले नाही. असे असताना 5 जी तंत्रज्ञान चाचण्यांच्या रेडिएशनमुळे कोरोना महामारीत रुग्णांचे मृत्यू होत असल्याची अफवा पसरवली जात आहे.
त्यावर लोकांनी विश्वास ठेवू नये. 5जी सेवा आणि कोरोनाचा दुरान्वेही संबंध नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेनेही स्पष्ट केले आहे. अशी माहिती सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक एस. पी. कोचर यांनी दिली आहे. दरम्यान, अशाप्रकारे अफवा पसरवणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलिसांनी दिले आहेत.

Sharing is caring!