Home Breaking News आगामी २४ तासात राज्यातील काही भागांत ! पाऊस आणि गारपीटीची शक्यता !

आगामी २४ तासात राज्यातील काही भागांत ! पाऊस आणि गारपीटीची शक्यता !

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8976*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

106 views
0

आगामी २४ तासात राज्यातील काही भागांत ! पाऊस आणि गारपीटीची शक्यता !

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :पुणे – महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्यापासून अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपीट होत आहे. आताही पुढील २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम बंगालचा किनारपट्टीपासून ते विदर्भा पर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने उत्तर कर्नाटकाचा काही भाग ते विदर्भापर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा पाऊस पडणार आहे

पुढील पाच दिवसात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यामध्ये जोरदार पाऊस पडेल, असा इशारा पुणे हवामान वेधशाळेने दिला आहे. यापूर्वीही राज्यात काही ठिकाणी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेती आणि फळ पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. पुढील पाच दिवसात ही अशाच प्रकारे नुकसान होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून उकाड्यात प्रचंड वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे दिवसाच्या कमाल तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचे सावट आठवडाभर कायम राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ही उन्हाळ्याचे चटके बसू लागले आहेत. मुंबईचे तापमान ३६ अंशाच्या पुढे गेले आहे.