मोठी दुर्घटना टळली:हिंदी महासागरात कोसळले चीनचे 21 टन वजनी अनियंत्रित रॉकेट, पृथ्वीच्या वातावरणात येताचताच अर्धे जळाले

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था-वाशिंग्टन :चीनचे अनियंत्रित रॉकेट लॉन्ग मार्च-B अखेर हिंदी महासागरत कोसळले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच या रॉकेटचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग जळून खाक झाला. ही माहिती, रायटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. US स्पेस फोर्सच्या 18th कंट्रोल स्क्वाड्रनने याची खात्री केली आहे.

चीनचे हे रॉकेट 100 फूट लांब आणि 21 टन वजनी होते. लॉन्ग मार्च 5बी रॉकेटला 29 एप्रिलला चीनच्या हाइनान द्वीपवरुन लॉन्च करण्यात आले होते. हे चीनच्या आंतरराष्ट्रीय स्पेश स्टेशनच्या प्रमुख मॉड्यूलला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत घेऊन जात होते. यादरम्यान, चीनचा या रॉकेटवरील ताबा सुटला आणि हे रॉकेट पृथ्वीच्या दिशेने निघाले. यापूर्वी, दक्षिणपूर्व अमेरिका, मेक्सिको, मध्यअमेरिका, करेबियन, पेरू, ईक्वाडोर कोलंबिया, वेनेजुएला, दक्षिण यूरोप, उत्तर किंवा मध्यआफ्रीका, मध्य पूर्व, दक्षिण भारत किंवा ऑस्ट्रेलियामध्ये हे रॉकेट कोसळणार, अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या.

यूएस स्पेस कमांडचे होते लक्ष्य

यापूर्वी, शुक्रवारी चीनचे परराष्ट्र मंत्री म्हणाले होते की, पृथ्वीच्या वातावरणात येताच रॉकेटचा बहुतेक भाग जळून खाक होईल आणि यामुले जास्त नुकसान होण्याची शक्यता नाही. तसेच, अमेरिकन सैन्याने सांगितले की, होते की, नियंत्रणाबाहेर गेलेल्या या रॉकेटवर यूएस स्पेस कमांडचे लक्ष्य आहे.

रॉकेट 4.8 मैलाच्या वेगाने पृथ्वीकडे येत होते

हॉवर्डचे अॅस्ट्रो फिजिस्ट जॉनाथन मैकडावलने सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितले की, पृथ्वीकडे येणाऱ्या या रॉकेटचा वेग 4.8 मैल प्रति सेकंद आहे. पण, वातावरणात येताच याचा वेग शंभरपट वाढेल.

You missed