Home क्राइम जगत 50 हजारासाठी वृद्ध पित्याचा छळ,विष पाजले, खोलीत धूर करून डांबून जीवे मारण्याचा प्रयत्न

50 हजारासाठी वृद्ध पित्याचा छळ,विष पाजले, खोलीत धूर करून डांबून जीवे मारण्याचा प्रयत्न

0
50 हजारासाठी वृद्ध पित्याचा छळ,विष पाजले, खोलीत धूर करून डांबून जीवे मारण्याचा प्रयत्न

 

50 हजारासाठी वृद्ध पित्याचा छळ,विष पाजले, खोलीत धूर करून डांबून जीवे मारण्याचा प्रयत्न

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,बीड-५० हजार रुपये न दिल्याने वृद्ध पित्यास घरात डांबून विष पाजण्यात आले, त्यानंतर तारेच्या साहाय्याने गळा आवळून घरात धूर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना पेठपांगरा (ता.आष्टी) येथे २० एप्रिल रोजी घडली. वृद्धावर रुग्णालयात उपचार सुरू असून जबाबावरून मुलगा, सून व नातवावर अंमळनेर ठाण्यात शुक्रवारी (दि.७) गुन्हा नोंद करण्यात आला.

काशीनाथ वाल्हू मिसाळ (८५, रा.पेठपांगरा, ता.आष्टी) असे त्या वृद्धाचे नाव आहे. त्यांचा मुलगा भिवसेन हा ऊसतोड मजूर आहे. एप्रिल २०२१ मध्ये मुलाने त्यांना ५० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, काशीनाथ यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे २० एप्रिल रोजी चिडलेल्या मुलाने पत्नी कांताबाई व मुलगा सोमीनाथ यांच्या मदतीने काशीनाथ यांना घरात डांबले. त्यांना बळजबरीने विष पाजले व नंतर तारेच्या साहाय्याने गळा आवळला. एवढेच नाही तर घरात जुन्या पिशव्या जाळून धूर करून दरवाजा बंद करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. काशीनाथ मिसाळ यांच्यावर शेवगाव (जि.अहमदनगर) येथे उपचार सुरू असून त्यांच्या जबाबावरून या तिघांविरोधात अंमळनेर ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंद करण्यात आला. धूर पाहून शेजाऱ्यांची धाव : काशीनाथ मिसाळ यांचे कुटुंब पेठपांगरा येथे शेतात वास्तव्यास आहे. २० एप्रिल रोजी दुपारी त्यांच्या घरातून धूर निघत असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर मुलगा भिवसेन यास फोन करून बोलावून घेतले गेले. त्यानंतर काशीनाथ यांना रुग्णालयात हलवण्यात आले. आरोपी फरार असून शोध सुरू असल्याचे सहायक निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी सांगितले.