अनैतिक संबंधाचा असाही थरार,दोन मुलांना सोडून प्रियकरासोबत पत्नी फरार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8953*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

177

अनैतिक संबंधाचा असाही थरार,दोन मुलांना सोडून प्रियकरासोबत पत्नी फरार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था/वाळूज – काही महिन्यांपूर्वी आपल्या पोटच्या दोन लेकरांना आणि पतीला सोडून गेलेल्या पत्नीचा विरह सहन न झाल्याने एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन नैराश्यात गेलेल्या पतीचे समुपदेशन केले आहे. तसेच त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले आहे. तसेच दोघा पती-पत्नींनी पुन्हा एकत्र राहावे असा सल्लाही पोलिसांनी दिला आहे. वेळेवर पोलिस पोहोचल्यामुळे संबंधित युवकाचा जीव वाचला आहे
रांजणगाव येथील रहिवासी असलेली २६ वर्षीय विवाहित महिला काही दिवसांपूर्वी आपल्या घराशेजारी राहाणार्‍या अविवाहित प्रियकरासोबत पळून गेली होती. तिने आपल्या साडेचार वर्षाच्या आणि ६ वर्षाच्या दोन मुलांना आपल्या पतीकडेच सोडले होते. अशा प्रकारे पत्नी सोडून गेल्याने संबंधित युवक नैराश्यात गेला. दरम्यान पत्नीचा विरह सहन न झाल्याने काल संबंधित युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
आत्महत्या करणार असल्याची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक आपल्या पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी पीडित पतीची समजूत घालून त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केला आहे. तर दुसरीकडे, एप्रिलमध्ये प्रियकरासोबत पळून गेलेल्या विवाहितेलाही तिच्या प्रियकराने सोडून दिले आहे. त्यामुळे तिही रांजणगावात एक स्वतंत्र खोली घेऊन राहात आहे. विशेष म्हणजे प्रियकराने सोडून दिल्यानंतर तिनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळीही पोलिसांनी तिची समजूत घालून आत्महत्या करण्यापासून रोखले होते.
प्रियकराने धोका दिल्यानंतर, संबंधित विवाहित महिला आपल्या पतीपासून विभक्त झाली असून रांजणगावातच स्वतंत्र खोली घेऊन राहात आहे. पती-पत्नीच्या भांडणात चिमुकल्यांची होणार होरपळ पाहून दोघांनीही पुन्हा एकत्र यावे, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.