कंगना राणौतला कोरोनाची लागण, इन्स्टाग्रामवरून दिली माहिती

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8939*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

149

कंगना राणौतला कोरोनाची लागण, इन्स्टाग्रामवरून दिली माहिती

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला कोरोनाची लागण झाली आहे. कंगनाने स्वत:  याबाबत माहिती दिली. बॉलिवूडमध्ये अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. अनेक राज्यात चित्रिकरणाला परवानगी नसली तरी काही राज्यात ग्रामीण भागात चित्रीकरण सुरू आहेत. त्यामुळे बॉलिवूडला कोरोनाचा विळखा अत्यंत घट्ट पकडत जात आहे.

सध्या ट्विटरपासून दूर असणाऱ्या कंगनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.  तिने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला थकल्यासारखं आणि डोळ्यात जळजळ होण्यासह अशक्त वाटत होतं. हिमाचलला जाता येईल असं वाटत होतं म्हणून मी काल माझी चाचणी केली आणि आज मी कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहे.’

कंगनाने पुढे असं म्हटलं आहे की, ‘मी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे. मला काही कल्पनाच नाही  आहे की हा व्हायरस माझ्या शरिरात पार्टी करतोय, आता मला एवढं माहिते की मी त्याला संपवेन, कोणत्याही शक्तिला तुमच्यापेक्षा वरचढ होऊन देऊ नका, तुम्ही जर घाबरलात तर ते आणखी तुम्हाला घाबरवेल. चला या कोविड-19 चा विनाश करूया, हा काही नाही आहे फक्त एक ठराविक काळाकरता आलेला ताप आहे ज्याला जास्त प्रसिद्धी मिळाली आणि काही लोकांना तो मानसिक त्रास देत आहे. हर हर महादेव’.