नागपूरमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, इंटरनेटवर पाहून आणि पुस्तकं वाचून रुग्णांना द्यायचा औषधं

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8934*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

328

नागपूरमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, इंटरनेटवर पाहून आणि पुस्तकं वाचून रुग्णांना द्यायचा औषधं

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर – नागपूरमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्यात आला आहे. बारावी पास डॉक्टर पुस्तकं वाचून रुग्णांवर उपचार करत असे. त्याने अनेक कोरोनाबाधितांवर उपचार केले असून अनेक बाधितांचा मृत्यूही झाला आहे. अखेर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरातून त्याला अटक करण्यात आली चंदन चौधरी असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे.

चंदन चौधरी याने नॅचरोपॅथीचं शिक्षणं घेतलं आहे. त्याने इंटरनेटवर पाहून रुग्णांवर उपचार केले. तसेच, पुस्तकं वाचून तो रुग्णांवर उपचार करत असे. धक्कादायक म्हणजे प्रेमी युगुलांचा अवैध गर्भपात करण्याचे काम हा बोगस डॅाक्टर दुप्पट पैसे घेऊन करायचा. याशिवाय तरुणी-महिलांना नर्सिंगचं प्रशिक्षणंही द्यायचा. कामठी पोलिसांनी सैलाबपुरा परिसरात छापा टाकून त्याला अटक केली आहे.