राज्यात पुढील चार दिवस वादळी पावसासह गारपिटीची शक्यता

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8924*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

144

राज्यात पुढील चार दिवस वादळी पावसासह गारपिटीची शक्यता

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, मुंबई – भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगत राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच हवामान खात्याने काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडा येथे पावसाच्या सरी बरसत आहेत. सातार्‍यात काही ठिकाणी गारपीटीसुद्धा नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर आता येत्या 1 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सातारा, सागंली, कोल्हापूर, रत्नागिरी, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.