ध्येय गाठण्या—

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8919*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

128

ध्येय गाठण्या—

ध्येय मोठे ठेवा । करा यत्न सेवा ।
मिळे मग मेवा । रे यशाचा ।।
कष्ट खूप करा । सातत्यास धरा ।
हाच मार्ग खरा । घ्या जाणूनी ।।
काळ आणि वेळ।नियतीचा खेळ ।
ध्येय पूर्ती मेळ । बसवावा ।।
आळसाची मळ ।अपयश कळ ।
कष्टाविन फळ । नाही कोणा ।।
यश खूप छळे।सहज न मिळे ।
वाटेवरी खिळे ।जागोजागी ।।
होऊनी चंदन । झिजवावे तन ।
सोसावेत घन ।ध्येयासाठी ।।
मानू नये हार ।प्रयत्नांची धार ।
संकटी प्रहार ।करा योग्य ।।
संकटे अडवा । विरोध कडवा ।
जीवन घडवा । स्व बळाने ।।
शब्दातून व्यक्त ।झाला युवा फक्त ।
कष्टाचेच भक्त । व्हावे तुम्ही ।।
श्री.युवराज गोवर्धन जगताप
     काटेगाव ता :- बार्शी
     जिल्हा:- सोलापूर
     9405237081