आई सगळं काही करते-स्वप्ना अनिल वानखडे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8900*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

161

आई सगळं काही करते

सासर माहेरच्या मंडळींना
प्रेमाच्या धाग्याने ती बांधते
लेकीला माहेर असावे म्हणून
तिची आई सासरला नांदते
किती निस्वार्थ असते हे नाते
किती गहीरे आहेत ऋणानुबंध
मी पणा कायम बाजूला सारून
जिवापलीकडे जपते ती संबंध
आपले थोडेसे ही दुःख बघून
अश्रू तिच्या डोळ्यांतून गळते
आपल्यापेक्षा कित्येक पटीने
जास्त काळीज आईचे जळते
लेकराचे सर्वकाही करतांना
अख्खे जीवन जीचे सरते
सर्वार्थाने हे सत्य आहे की
आई सगळं काही करते

स्वप्ना अनिल वानखडे

वर्धा
७३७८८९२५८४