अभिनेत्री श्रीपदा यांचं कोरोनामुळे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8877*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

186

अभिनेत्री श्रीपदा यांचं कोरोनामुळे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, मुंबई : (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाला हादरुन टाकले आहे. अनेक कलाकारांनी कोरोनामुळे जगाचा निरोप घेतला. आता हिंदी आणि भोजपुरी अभिनेत्री श्रीपदा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काल ५ मे रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
श्रीपदा यांनी दक्षिण चित्रपटसृष्टीबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतही उत्तम काम केले आहे. श्रीपदा यांनी बरीच वर्ष काम केले त्यांचे लाखो चाहते देखील होते. त्यांनी आतपर्यंत ६८ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. श्रीपदा यांनी १९७८ मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी ‘पुराना पुरुष’, तर दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या ‘धर्म संकट’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढंच नाही तर श्रीपदा यांनी गोविंदा, धर्मेंद्रसारख्या अनेक कलाकारांसोबत काम केले आहे.