Home Breaking News माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन

माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन

0
माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन

माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमणामुळे अजून एका मोठ्या नेत्याचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय लोकदल (RLD) प्रमुख आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र आणि माजी केंद्रीय मंत्री चौदरी अजित सिंह यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले.

82 वर्षीय चौधरी अजित सिंह यांनी गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांना मागील काही दिवसांपासून कोरोना संक्रमण झाले होते. यातच फुफ्फुसात संक्रमण झाल्यामुळे त्यांना निमोनियादेखील झाला होता. मागील दोन दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती.

जाट समाजाचे मोठे नेते होते चौधरी अजित सिंह

चौधरी अजित सिंह हे देशाचे माझी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे पुत्र होते. उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारसंघातून ते सातवेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांचे वर्चस्व पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. ते जाट समाजाचे मोठे नेते होते.

मागील 2 लोकसभा आणि 2 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकदलला चांगली कामगिरी करता आली नव्हती. याच कारणामुळे, चौधरी अजित संह यांचा 2019 लोकसभा निवडणुकीत बालेकिल्ला असलेल्या बागपतमधून आणि त्यांचे पुत्र जयंत चौधरी यांचा मथुरा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता.