अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8859*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

153

अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, मुंबई : कोरोनाच्या दुस-या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांचा कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. अभिलाषा यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. शिवाय मराठी मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

अभिलाषा काही दिवसांपूर्वी कामानिमित्त वाराणसीला गेल्या होत्या. तिथे त्यांना ताप येत असल्याने त्या मुंबईत परतल्या. कोरोना चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आल्याने त्या रुग्णालयात दाखल झाल्या. मागील चार दिवस अभिलाषा आयसीयूमध्ये होत्या. अखेर उपचारादरम्यान 4 मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

अभिनेत्री पल्लवी पाटीलने सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट करत दुःख व्यक्त केले आहे. अभिलाषा यांनी ‘बापमाणूस’ मालिकेत पल्लवीच्या आईची भूमिका साकारली होती. ‘आई होतीस तू माझी,’ असे म्हणत पल्लवीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिलाषा यांनी ‘छिछोरे’ चित्रपटात डॉक्टरची भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्या ‘बायको देता का बायको’, ‘मलाल’, ‘प्रवास’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकल्या होत्या.