Home आरोग्य सामान्य जनतेचा आरोग्य यंत्रणेला सवाल, कोरोनाबाधित युवकाचे अखेर असे का झाले हाल

सामान्य जनतेचा आरोग्य यंत्रणेला सवाल, कोरोनाबाधित युवकाचे अखेर असे का झाले हाल

0
सामान्य जनतेचा आरोग्य यंत्रणेला सवाल, कोरोनाबाधित युवकाचे अखेर असे का झाले हाल

सामान्य जनतेचा आरोग्य यंत्रणेला सवाल,
कोरोनाबाधित युवकाचे अखेर असे का झाले हाल

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,चंद्रपूर : दम्याचा त्रास वाढल्याने कळमगाव गन्ना या छोटाश्या आडवळणातील गावापासून तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी येरझारे मारले. जगण्यासाठी ४00 किमीचा प्रवास केला. तरीही नशिबी वेदनादायक मरणच आल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्रशासकीय व आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेचा आदिवासी युवक बळी ठरला आहे. विकास रमेश गेडाम (वय ३0) रा. मौजा कळमगाव गन्ना (ता. सिंदेवाही) असे त्या युवकाचे नाव आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर जिल्हय़ाच्या ठिकाणीही बेड मिळाला नाही किंवा ऑक्सिजनही उलब्ध झाले नाही. साधा उपचारही न मिळाल्याने त्या युवकाला अखेर वेदनादायी मरण पत्करावे लागले. जिल्हय़ाच्या ठिकाणीही आरोग्य व्यवस्था पार कोलमडी आहे. प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे आणि आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आली आहे. यामुळे आता प्रत्येक नागरिकाने सावधान राहण्याची गरज आहे.
प्राप्त माहितीनुसार, मौजा कळमगाव गन्ना (ता सिंदेवाही) येथील विकास रमेश गेडाम (वय ३0) याला १ मे रोजी दम्याचा त्रास वाढला. त्याने सिंदेवाहीला नेऊन कोरोना टेस्ट केली. आरटीपीसीआर रिपार्ट लवकर मिळाली नाही. यामुळे अँन्टिजेन केले, या चाचणीत तो निगेटिव्ह आला. यानंतर सिटीस्कॅन केले. ग्रामीण रुग्णालयाच्या डाक्टरला माहिती कळवली. त्यांनी पेशंटला ऑक्सिजची गरज आहे. त्वरित हॉस्पिटला नेण्यास सांगितले. २ मेला शासकीय अँम्बुलन्स मागविली. मात्र मिळाली नाही. शेवटी खासगी वाहनाने सिंदेवाही येथील हास्पिटल शोधले, तीथे अँडमिट केल्या गेले नाही. नंतर ब्रम्हपुरीतही बेड मिळाला नाही. गडचिरोलीला नेले तेथेही दाखल करून घेतले नाही. शेवटी चंद्रपूरला आणले. खासगी हास्पिटलमध्येही बेड उपलब्ध नव्हते. अशाप्रकारे या दिवशी २५0 किमीचा प्रवास उपचारासाठी करावा लागला.
शेवटी चंद्रपूरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात आणले. तेथे चिट्टी काढून डाक्टरकडे ऑक्सिजनसाठी नेले. विकासची स्थिती गंभीर होत चालली होती. त्याला ऑक्सिजनची नितांत गरज होती. त्याच्यावर उपचार सुरू करा, असे वारंवार हात जोडून विनंती नातेवाई करीत होते. परंतु डाक्टरांनी विकासकडे साधे डोकावूनही पाहिले नाही व रांगेत राहण्यास सांगितले. लिस्टमध्ये नाव लिहा तुमचा नंबर येईल तेव्हा तुम्हाला आवाज देणार असे म्हणत बसवून ठेवले. कोविड रूममध्ये ज्या ठिकाणी ऑक्सिजन लावलेले रुग्ण होते, त्या ठिकाणी सांयकाळपयर्ंत विकासला ठेवल्या गेले. विकासला स्वास घेण्यास त्रास होत असल्याने तो खूप तळफळत होता. दम दाटत असल्याचे विकास वारंवार डॉक्टरांना सांगत होता. डॉक्टरला अक्सिजन बेड द्या, आमच्या पेशंटला बघा, अशी विनंती नातलग करीत होते. परंतु, बेड मिळाला नाही. शेवटी दवाखान्यासमोरील अँम्बुलन्समधून २000 रु. प्रति तासाप्रमाणे विकासला ऑक्सिजन उपलब्ध करून दिले. ते देखील फक्त २ तासच मिळाले. शेवटी रात्री विकासला गावाकडे परत नेण्यात आले. दुसर्‍या दिवशी ३ मे रोजी पुन्हा उपचारासाठी नवरगाव, ब्रम्हपुरी, सिंदेवाही , गडचिरोली, चंद्रपूर येथील अनेक हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचारासाठी नातेवाईकांनी विनंती केली. उसनवारी करून पैसाही जमविला मात्र विकासची मृत्यूची झुंज अखेर गाडीतच संपली, गाडीतच त्याची प्राणज्योत मालवली.
तालुक्याच्या ठिकाणी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, अँम्बुलन्स मिळाली असती तर कदाचित विकासचे प्राण वाचले असते. मात्र सुस्त प्रशासन आणि व्हेंटिलेरवरील आरोग्य व्यवस्था यामुळे प्रत्येकावरच अशी वेळ येऊ शकते.