मेयो, मेडिकलमध्ये इंटर्न डॉक्टरांचा संप सुरूच

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8842*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

195

मेयो, मेडिकलमध्ये इंटर्न डॉक्टरांचा संप सुरूच

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : दोन दिवसांपासून मेयो-मेडिकलमधील ३५0 इंटर्न डॉक्टर संपावर गेले आहे. बुधवारी संपाचा दुसरा दिवस होता. प्रशासन-डॉक्टरांमध्ये झालेल्या चर्चेतून कोणताच तोडगा निघालेला नाही.
मार्डने इंटर्नच्या मागण्यांची बाजू घेतली असून, जर त्यांची पूर्तता झाली नाही, तर निवासी डॉक्टरही संपावर जातील, असा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी मेयो रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर इंटर्न डॉक्टरांनी निदर्शने केली. गुरुवारी मागण्या मान्य झाल्या नाही तर इंटर्नकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई, पुणे जिल्ह्यातील डॉक्टरांना कोरोना सेवा दिल्यानंतर अतिरिक्त मानधन देण्यात येत आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांतील इंटर्न डॉक्टरांसोबत भेदभाव करण्यात येत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे इंटर्न डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ. शुभम नागरे म्हणाले. गुरुवारी परत एकदा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, नीट पीजीसारख्या परीक्षा स्थगित करण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या निर्णयाची केंद्राने समीक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.