Home Breaking News आगीत पाच दुकाने भस्मसात, लाखोंची हानी

आगीत पाच दुकाने भस्मसात, लाखोंची हानी

0
आगीत पाच दुकाने भस्मसात, लाखोंची हानी

आगीत पाच दुकाने भस्मसात, लाखोंची हानी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : लकडगंज पोलिस ठाणेजवळील एका आरा मशिनच्या दुकानाला आग लागली. आगीने भीषण रूप धारण करताच, अवतीभवतीच्या अन्य दुकानांनाही आवाक्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी मोर्चा सांभाळला. पाच तासांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यावेळी आग विझविताना विभागाच्या दोन कर्मचार्‍यांना धुरामुळे श्‍वसनाचा त्रास झाला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. फायरमन प्रवीण झाडे व ऐवजदार राजू आदमने अशी या कर्मचार्‍यांची नावे आहेत.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी घटनेची माहिती मिळताच विभागाच्या १0 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. तोवर आगीने रौद्ररूप धारण केले होते. ज्या ठिकाणी आग लागली तेथे दुकाने जवळजवळ आहेत. येथील एका प्लॉटवर ३ तर दुसर्‍या प्लॉटवर २ दुकाने आहेत. अश्‍विन टिंबर मार्ट या दुकानातील जॉबवर मशिन जळाल्याने आग लागली. ही आग आटोक्यात येण्याऐवजी पसरत गेली. अशोक डोबळे हे या दुकानाचे मालक आहेत. या दुकानात अंदाजे १२ लाखांचे नुकसान झाले. येथून आग चांगलीच पसरली. लगेच आगीने दुसर्‍या दुकानाला आवाक्यात घेतले. आगीचे लोळ वाढल्यानंतर अवतीभवती असलेल्या पाचही दुकानात आग पसरली. दुसरे दुकान हे अपना गुड्स गॅरेज असून याचे मालक इशान खान आहेत. या दुकानातील फाच्र्युन मटेरियल जळून राख झाले असून, अंदाजे २ लाखांच्या नुकसानीचा अंदाज अग्निशमन विभागाने वर्तविला आहे. तिसरे दुकान परमात्मा एक फर्निचर याचे मालक तानाजी रामभाऊ खेडकर आहेत. या दुकानातील पलंग, डायनिंग, सोपा, ड्रेसिंग टेबल आणि आलमारी जळाली. या दुकानातील अंदाजे ५ लाख रुपयांचे साहित्य जळून राख झाले. चवथे दुकान हे राजेंद्र टिम्बर मार्ट, राजेंद्र नारायण डोबळे यांचे आहे. येथील आरा मशिन, जॉबवर्क मशिन आणि लाकूड जळाले. या दुकानातील अंदाजे ११ लाखांचे नुकसान झाले. पाचवे दुकान शर्मा स्टार्ट फर्निचर, रोहित शर्मा यांचे आहे. येथील चार रंदा मशिन, मोटर सायकल व स्कू टी असे मिळून अंदाजे अडीच लाखांचे नुकसान झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. शार्ट सर्कि टमुळे ही आग लागली. दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी अग्निशमन विभागाचे बंब आगीवर नियंत्रण मिळवून परत आले. यात लकडगंज, सक्करदरा व त्रिमूर्तीनगर येथील प्रत्येकी दोन बंब तर गंजीपेठ, कॉटन मार्केट, सुगतनगर व कळमना येथून प्रत्येकी एक बंबांनी मिळून ही आग विझविली.