Home Breaking News 46 रुपयांनी स्वस्त झाला एलपीजी गॅस सिलेंडर

46 रुपयांनी स्वस्त झाला एलपीजी गॅस सिलेंडर

0
46 रुपयांनी स्वस्त झाला एलपीजी गॅस सिलेंडर

46 रुपयांनी स्वस्त झाला एलपीजी गॅस सिलेंडर

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, (वृत्तसंस्था) नवी दिल्ली – एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांना या महिन्यात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सरकारने सिलेंडरच्या सतत वाढणाऱ्या किंमतींपासून दिलासा दिला आहे. पण हा दिलासा सर्वसामान्यांना नाही तर लहान दुकानदार आणि हॉटेल मालकांना मिळाला आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमती पेट्रोलियम कंपन्यांनी या महिन्यात 45.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. ही कपात केवळ 19 किलो कमर्शिअल सिलेंडरमध्ये करण्यात आली आहे. 1 मेपासून 19 किलो कमर्शिअल सिलेंडरचे नवीन दर लागू झाले आहेत.

दरम्यान कोणताही बदल 14.2 किलो घरगुती सिलेंडरच्या किंमतीत झालेला नाही. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मागील महिन्यात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. दिल्लीत आज एलपीजी सिलेंडरची किंमत आता 809 रुपये झाली आहे.

एलपीजी सिलेंडरची किंमत यावर्षी जानेवारीत 694 रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढून 719 रुपये झाली. यानंतर 15 फेब्रुवारीला त्याची किंमत 769 रुपयांवर गेली. 25 फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली आणि ती 794 रुपये झाली. त्याच वेळी मार्चमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 819 रुपये करण्यात आली.

घरगुती सिलेंडरच्या किंमतीत गेल्या वर्षी डिसेंबर-2020 पासून कोणताही बदल झाला नाही. त्यावेळी दिल्लीत एलपीजी सिलेंडरची किंमत 694 रुपये होती. यानंतर, घरगुती सिलेंडरच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. या महिन्यातदेखील अशी अपेक्षा होती की तेल कंपन्या पुन्हा किंमती कमी करतील, पण तसे झाले नाही.