आपले लफडे असेच चालत रहावे आरामात, दोन्ही बायकांनी पतीचा खून करून फेकले शेतात

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8811*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

285

आपले लफडे असेच चालत रहावे आरामात,
दोन्ही बायकांनी पतीचा खून करून फेकले शेतात

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,बीड: अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या  केल्याप्रकरणी पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या तलवाडा पोलीस ठाण्यात हद्दीत घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी शनिवारी एका व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, मृताच्या शरिरावर घातपाताचे व्रण होते. मृत व्यक्तीच्या पत्नीनेच अनैतिक संबंधातून त्याची हत्या केली असल्याची माहिती उघड झाली आहे.

ज्ञानेश्वर चव्हाण (वय, 32) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ज्ञानेश्वर हे गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथील रहिवासी होते. परंतु, शनिवारी राजापूर परिसरातील एका शेतात त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या चेहऱ्यावर आणि गळ्याभोवती फास दिल्याचे व्रणही होते. ज्ञानेश्वर यांच्या पहिल्या पत्नीने अनैतिक संबंधातून त्यांची हत्या केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. त्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर यांच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या घनटेनंतर आजुबाजूच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर चव्हाण यांना दोन बायका होत्या. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे अप्पा शिंदे यांच्याशी विवाहबाह्य संबंध जुडले होते. परंतु, ज्ञानेश्वर त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत होता. त्यामुळे मृत ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने ज्ञानेश्वरच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार, या दोघांनी ज्ञानेश्वर यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह गेवराई तालुक्यातील राजापूर शिवारात नेवून टाकल्याचे सांगितले जात आहे.