दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात जात असलेला दारू साठा पकडला

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8801*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

183

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात जात असलेला दारू साठा पकडला

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात जात असलेला दारू साठा थानिक गुन्हे शाखेच्या चमूने मोठ्या शिताफिने पकडला. सदर कारवाई सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. यात २ लाख ६२ हजार रुपये किमतीची ७८ पेट्या देशी दारू व एक स्कॉर्पिओ किंमत अंदाजे ७ लाख असा एकूण ९ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हे शाखेची चमू उमरेड उपविभागात गस्तीवर असताना त्यांना सालेभट्टी येथील दारू दुकानातून चंद्रपूर जिल्ह्यात दारू नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे उमरेड भिसी मार्गावर सापळा रचण्यात आला. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास एक सिल्वर रंगाची स्कार्पिओ (क्र. एम. एच. ३१ बी. बी. १७३७) भिसीच्या दिशेने जातांना पोलिसांना दिसली. तीला थांबवुन झडती घेतली असता त्यात देशी दारुच्या निप ( १८0 ) भरलेल्या ७८ पेट्या आढळून आल्यात.
दारुसह वाहन ताब्यात घेवून चालक संदिप सार्थीक मेर्शाम ( वय ३0 ) रा. वार्ड क्र. ६, भिसी, जि. चंद्रपूर याला अटक केली. सदर दारु हि ऊमरेड भिसी मार्गावर सालेभट्टी चोरविहिरा गट ग्राम पंचायतच्या ( ता. भिवापूर ) हद्दित नव्यानेच सुरू झालेल्या दारू दुकानातून आनल्याचे व विक्री करिता भिसी येथे घेवून जात असल्याचे चालकाने सांगितले. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वैरागडे यांच्या माहितीवरुन सकार्पिओ चालक संदिप मेर्शाम सह दारू दुकान चालक भटघरे आणी मालक (परवाना धारक) कोलते यांच्याविरुद्ध भिवापूर पोलिस स्टेशनला ६५ (अ), ८३ म.दा.का. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
वरील कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरुन गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार याच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक जावेद शेख, शिपाई राधेशाम कांबळे, बालाजी साखरे, भाऊराव खंडाते यांनी पार पाडली. पुढील तपास ठाणेदार महेश भोरटेकर याच्या मार्गदर्शनात केला जात आहे.