Home Breaking News हैदराबाद प्राणी संग्रहालयातील ८ सिंहांना कोरोनाची लागण !

हैदराबाद प्राणी संग्रहालयातील ८ सिंहांना कोरोनाची लागण !

0
हैदराबाद प्राणी संग्रहालयातील ८ सिंहांना कोरोनाची लागण !

हैदराबाद प्राणी संग्रहालयातील ८ सिंहांना कोरोनाची लागण !

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, हैदराबाद – भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलेले असतानाच या कोरोनाची लागण आता प्राण्यांनाही होऊ लागली आहे.
भारतात प्रथमच हैदराबादच्या नेहरू ज्युऑलॉजिकल पार्कमधील ८ आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. या आठही सिंहांची rt-pcr चाचणी केल्यानंतर या सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी इन्स्टिट्यूटने मात्र या सिंहांच्या कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची पुष्टी केलेली नाही.

त्यामुळे आता सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी इन्स्टिट्यूट या सिंहांच्या नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग पद्धतीने विस्तृत तपासणी करणार आहे. त्यामुळे या सिंहांना माणसांपासून कोरोनाचा संसर्ग झाला का? याचा तपास केला जाणार आहे. या इन्स्टिट्यूटने प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सांगितले आहे. तसेच कोरोना संक्रमित सिंहांवर उपचार सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सिहांच्या फुप्फुसाचा ct-scan केला जाणार आहे. सिंहांच्या फुफ्फुसात कोरोनाचा संसर्ग झाला आहे का? याची माहिती घेतली जाणार आहे. या ८ सिंहांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी दक्षिणेतील “द हिंदू” या बड्या वर्तमानपत्राने दिली आहे. या सिंहांमध्ये २४ एप्रिलला कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. यासीन यांच्यामध्ये कोरडा खोकला, नाक वाहणे आणि अन्नावरची वासना उडाल्याची लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर या सिंहांचा स्वाब घेण्यात आला. हैदराबाद येथील नेहरू ज्युऑलॉजिकल पार्क हे आशिया खंडातील सर्वात मोठे प्राणिसंगहालय आहे. जगात इतर ठिकाणी प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर हे प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्राणिसंग्रहालयातील १२ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण झालेली आहे.