नागपुरातील शिकाऊ डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8782*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

216

नागपुरातील शिकाऊ डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले

-वेतन वाढ, विमा कवच आणि इतर मागण्यांसह राज्यातील तीन हजार शिकाऊ डॉक्टरांनी हा संप पुकारला

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असतानाच नागपुरातील शिकाऊ डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. वेतन वाढ, विमा कवच आणि इतर मागण्यांसह राज्यातील तीन हजार शिकाऊ डॉक्टरांनी हा संप पुकारला आहे. या संपात मेयो, मेडिकलमधील 350 शिकाऊ डॉक्टर सहभागी झाले होते. मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांसाठी असलेले वॉर्ड फुल्ल आहेत. त्यातच आता शिकाऊ डॉक्टरांनी संप पुकारल्याने रुग्णसेवेवर परिणाम झाला होता.

यावेळी बोलताना शिकाऊ डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ. शुभम नागरे यांनी सांगितले कि, पुणे व मुंबईच्या शिकाऊ डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या सोयी राज्यातील इतर शिकाऊ डॉक्टरांना मिळत नाहीत. त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधावे व विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. गेल्यावर्षी कोविड ड्युटीमध्ये मुंबई व पुण्याच्या शिकाऊ डॉक्टरांना 50 हजार रुपये मानधन मिळाले होते. हे मानधन राज्यातील सर्व शिकाऊ डॉक्टरांना देण्यात यावे. 300 रुपये प्रती दिवस जेवण, प्रवास व प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात यावा, कोविड ड्युटीनंतर क्वारंटाईन होण्याची सोय असावी, आजारी पडल्यास उपचाराची जबाबदारी शासनाने उचलावी, शासनाचे विमा कवच प्रदान करावे यांसह आमच्या आदी मागण्या आहेत. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील असेही डॉ. नागरे यांनी सांगितले. मेडिकलमधील 200 तर मेयोमधील 150 डॉक्टर या संपात सहभागी झाले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांसाठी असलेले वॉर्ड फुल्ल आहेत. सर्वच विभागातील डॉक्टरांची ड्युटी कोविडमध्ये लावण्यात आली आहे. त्यांच्या हाताखाली शिकाऊ डॉक्टर काम करत आहेत. परंतु या शिकाऊ डॉक्टरांनी आज संप पुकारल्याने रुग्णालयातील रुग्ण सेवेवर परिणाम झाल्याचे दिसून आले.