Home Breaking News कोरोना चाचणीचा खेळखंडोबा, पालिकेत बाधित-खासगी म्हणते ठणठणीत?

कोरोना चाचणीचा खेळखंडोबा, पालिकेत बाधित-खासगी म्हणते ठणठणीत?

0
कोरोना चाचणीचा खेळखंडोबा, पालिकेत बाधित-खासगी म्हणते ठणठणीत?

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – कोरोना रोगाने साºया जगात थैमान घातले असतांना महाराष्ट्र राज्यातही मोठ्या प्रमाणात रुग्णांचे हाल होत आहे़ जनता शासकिय यंत्रणेवर अवलंबुन असतांना बेड, आँक्सिजन व इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची हयगय होत आहे़ अशातच नागपूर शहरातील एका रुग्णाला कोरोना चाचणीसंदर्भात चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला़ नागपूर शहरातील एका ५६ वर्षीय इसमाला डोळ्याची शस्त्रक्रिया करायची होती़ मात्र डाँक्टरांनी शस्त्रक्रियेपुर्वी कोरोना चाचणी करण्याचे त्या इसमाला सांगितले़ त्यांनी लगेच वेळ न गमावता नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील केंद्रात जावून आरटीपीसीआर चाचणी केली़ दोन दिवसांनी त्यांना बाधित असल्याचा अहवाल देण्यात आला़ अशातच काहीच लक्षणे नसल्यामुळे त्या इसमासह घरचेही घाबरले़ आता सर्वत्र कोरोना रोगामुळे तसेही दहशहतच आहे़ लक्षणे नसल्यामुळे त्यांनी त्याच दिवशी खासगी केंद्रावर चाचणी केली असता ती निगेटीव्ह आली़ संभ्रमाची स्थिती निर्माण झालेल्या त्या इसमाला व कुटुंबीयांना काहीच कळले नाही़ शासकिय अधिकारी कोरोना रोगासाठी सज्ज असलेली पोकळ यंत्रणेची वाह वा करीत असतांना कोरोनाच्या पार्श्वभुमिवर असा अहवाल येणे हे काळजीकरणारेच आहे़ यावरून लक्षात येते की कोरोना रोगाचे वर्ष उलटुनही आपली आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे़ आरोग्य यंत्रणेवर कामाचा ताण असला तरी जनतेची मानसिकता ही तपासायला हवी़ असे अनेक उदाहरणे मागील काही दिवसांमध्ये नागपूर शहरात पहायला मिळाले़ पुढे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग याची काही दखल घेणार कि, असाच भोंगळ कारभार सुरू राहणार याकडे सर्वांचे लक्ष आहे़