Home Breaking News लग्नाआधीच नववधूने केला कहर, होणा-या नव-याला दिले जहर

लग्नाआधीच नववधूने केला कहर, होणा-या नव-याला दिले जहर

0
लग्नाआधीच नववधूने केला कहर, होणा-या नव-याला दिले जहर

लग्नाआधीच नववधूने केला कहर, होणा-या नव-याला दिले जहर

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नेर(यवतमाळ) : कुठलीही नववधू आपल्या होणा-या नव-यासोबत सात जन्माची गाठ बांधून पुढील आयुष्याची स्वप्न रंगवीत असतात. परंतु, नववधू अर्चना गुलाब पवार हया नववधूने आपल्या बहिण-भावाला सोबत घेऊन चक्क भावी नवरदेवाचा मृत्यूचा कट रचला. हा कट लग्नाच्या चार दिवस आधी रचला गेला असल्याचे उघडकीस आले. ही घटना नेरमध्ये घडल्यामुळे नेर शहरात खळबळ उडालेली आहे.
नेर तालुक्यातील कोहळा येथील २३ वर्षीय किशोर परसराम राठोड या तरुणाचे लग्न बाभूळगाव तालुक्यातील जाबुळनी या गावातील अर्चना गुलाब पवार या २२ वर्षीय तरुणीशी लग्न ठरले होते. रितीरिवाजाप्रमाणे ज्येष्ठ व्यक्तीच्या साक्षीने हे लग्न ठरले. या लग्नाची तारीख १९ एप्रिल काढण्यात आली. या लग्नाच्याआधी १५ एप्रिलला नववधूचा फोन या तरुणाला आला. उन्हाळाअसल्यामुळे नेर येथील साईबाबा आईस्क्रीम पार्लरमध्ये भेटण्यासाठी बोलाविण्यात आले. तिच्यासोबत तिची बहीण पायल पवारव दोन भाऊ रवी पवार, विक्की पवार हे सोबत होते. या सर्वांनी आईस्क्रीम खाल्ली व नंतर दोन्ही भाऊ तिथून निघून गेले. नववधुने नवरदेवाला स्टेशनरी खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपये मागितले व ते नवरदेवाने दिले. स्टेशनरी खरेदी केल्यानंतर पुन्हा शीतपेयाची मागणी करण्यात आली. यावेळी तिच्या बहिणीने खरेदी केलेले टेशनरी दाखवत नवरदेवाचे लक्ष विचलित केले. व याचवेळी वधूने नवरदेवाच्या शीतपेयांमध्ये विषारी औषधे टाकले. ते शितपेय नवरदेवाने प्राशन केले. ही सर्व घटनाक्रम साईबाबा येथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. शीतपेय पिल्यानंतर त्याचा मित्र सचिन भास्कर बसवनाथे यांच्या गाडीवर बसून कोहळ्याकडे रवाना झाले असता आजंती रोडवर युवकाला चक्कर येऊन कोसळला असता त्याला त्याच्या मित्राने नेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला यवतमाळ येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये भर्ती केले. योग्य उपचारानंतर नवरदेव दहा दिवसांनी सुखरुप घरी परत आला. या घटनेची माहिती या युवकांनी नेर पोलिस स्टेशनला दाखल केली. या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध ३0७,१२0 बी.३४ अन्वये भा.दं.वि.गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. पुढील तपास नेर पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्निल निराळे, राजेश चौधरी करीत आहे.