निवडणुका संपताच, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8759*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

163

निवडणुका संपताच, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नवी दिल्ली: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत तब्बल 66 दिवसांनंतर वाढ झाली, असून पेट्रोल 15 पैशांनी तर डिझेल 18 पैशांनी वाढले आहे. 27 फेब्रुवारीनंतर देशात पहिल्यांदाच इंधनाची दरवाढ झाली आहे. मधल्या काळात पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका असल्यामुळे इंधनाच्या किंमती ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती या दोन महिन्याच्या काळात वाढल्या असूनही देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. यामागे साहाजिकच पाच राज्यातील निवडणुका हे कारण होते. पण जशा या निवडणुका संपल्या तसे लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. निवडणुका झाल्यानंतर आता होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार एवढे मात्र नक्की आहे. आता या पुढे रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे काही विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ होऊन ती 96.95 रुपये, तर डिझेलची आजची किंमत ही 87.98 रुपये एवढी झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आता 90.55 रुपये एवढे झाले आहे तर डिझेल 80.91 रुपये एवढे झाले आहे.

15 जून 2017 पासून देशात इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.