तामिळनाडूत सत्ता मिळाली डीएमकेला, म्हणून जीभ कापून नवस तिने फेडला

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8754*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

166

तामिळनाडूत सत्ता मिळाली डीएमकेला, म्हणून जीभ कापून नवस तिने फेडला

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चेन्नई : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा कल काल हाती आला. त्यानुसार तामिळनाडूमघ्ये डीएमकेला अभूतपूर्व यश मिळालं. त्यामुळे रामनाथपूरम जिल्ह्यात एका डीएमके समर्थक महिलेने मंदिराबाहेर जीभ कापली आहे. डीएमकेची सत्ता येण्यासाठी या महिलेने नवस केला होता. तो फेडण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर सदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
वनिथा असं या 32 वर्षीय महिलेचं नाव आहे. ही महिला परमाकुडी येथे राहते. तिच्या नव?्याचं नाव कार्तिक आहे. डीएमकेला बहुमत मिळाल्यानंतर आज सकाळी ही महिला मंदिरात गेली. तिला मंदिरात देवाच्या प्रतिमेसमोर जीभ कापून नवस फेडायचा होता. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तामिळनाडूत कडक निर्बंध लागू आहेत. मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांमध्ये जाण्यासही मज्जाव करण्यात येत आहे. वनिथा मंदिराजवळ गेली तेव्हा मंदिराचा गेट बंद असलेला दिसला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत नवस फेडायचा असल्याने तिने मंदिराच्या गेटवर उभं राहूनच जीभ कापली. त्यामुळे रक्ताच्या चिळकांड्या उडाल्याने ती मंदिराबाहेरच बेशुद्ध होऊन पडली.

प्रकृती स्थिर
वनिथाला रक्तबंबाळ अवस्थेत काही लोकांनी पाहिले. त्यामुळे या लोकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतं. तामिळनाडूत राजकीय नेते आणि सेलिब्रिटींवर येथी लोक वेड्या सारखं प्रेम करतात. आपल्या नेत्यासाठी अनेक कार्यकर्ते मुंडन करून फिरत असतात. विशेष करून तामिळनाडूतील लोक डीएमके आणि एआयएडीएमके या दोनच प्रमुख पक्षांवर सर्वाधिक प्रेम करतात. 5 डिसेंबर 2016 रोजी एआयएडीएमकेच्या नेत्या जयललिता यांचं निधन झालं होतं. या धक्क्याने 30 लोकांनी प्राण सोडले होते.