Home Breaking News ‘रक्षकांचा’ कोरोना बनला ‘भक्षक’, 4 महिन्यात 95 पोलिसांचा मृत्यु

‘रक्षकांचा’ कोरोना बनला ‘भक्षक’, 4 महिन्यात 95 पोलिसांचा मृत्यु

0
‘रक्षकांचा’ कोरोना बनला ‘भक्षक’,  4 महिन्यात 95 पोलिसांचा मृत्यु

‘रक्षकांचा’ कोरोना बनला ‘भक्षक’,

4 महिन्यात 95 पोलिसांचा मृत्यु

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, मुंबई : कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाल्याने राज्यात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. लॉकडाऊनवर करडी नजर ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी कंबर कसली आहे. मात्र, असं असतानाच त्यांच्यावर कोरोनाने घाला घातला आहे. गेल्या चार महिन्यांत राज्यात तब्बल ९५ पोलीस कर्मचारी आणि अधिका-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, गेल्यावषीर्पासून आतापर्यंत 427 पोलीस कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होत होता. पोलिसांसाठी तत्काळ मदतही होत होती. मात्र, कोरोनाच्या दुस?्या लाटेत ज्याप्रमाणे इतर सर्वसामान्य होरपळले आहेत त्याचप्रमाणे फ्रंट लाईनवरून लढणा-या पोलिसांनाही दुस-या लाटेविरोधात सामना करावा लागत आहे. भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मार्च 2020 पासून सुरु झाला. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल 427 पोलीस कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात 2020 मध्ये 332 पोलिसांचा कोरोनामुळे जीव गेला. तर गेल्या 4 महिन्यात 95 पोलीस कर्मचारी आणि अधिका-यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

2021 च्या सुरुवातीला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचा?्याचं प्रमाण कमी होतं. पण एप्रिल महिन्यात तब्बल 64 पोलिसांचा कोरोनामुळे जीव गेलाय. तर मे महिन्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसांत 5 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये तरुण पोलीस कर्मचा-यांचा मृत्यूचं प्रमाण जास्त असल्यामुळे पोलीस दलासमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

2021 मध्ये जानेवारी ते मार्च महिन्यात पोलिसांच्या मृत्यूचं प्रमाण नियंत्रणात होतं. मात्र, एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. या दुस?्या लाटेत 64 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर मे महिन्याच्या 2 दिवसात 5 पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या दुस-या लाटेत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस दलाच मोठं नुकसान होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

2021 मध्ये पोलिसांच्या मृत्यूचं प्रमाण

जानेवारी झ्र 12 पोलिसांचा मृत्यू
फेब्रुवारी झ्र 2 पोलिसांचा मृत्यू
मार्च झ्र 12 पोलिसांचा मृत्यू
एप्रिल झ्र 64 पोलिसांचा मृत्यू
मे झ्र 5 पोलिसांचा मृत्य (2 दिवसात)

एप्रिल महिन्यात कोरोनामृतांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली

महाराष्ट्रात गेल्या एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या एकट्या एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत 25 टक्के वाढ झाली. तर नव्याने बाधित होणा-यांची संख्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 2 लाख 80 हजार इतकी झाली आहे. त्यामुळे राज्याती कोरोनाच्या दुस-या लाटेने एप्रिल महिन्यात उच्चांक गाठला असून बाधितांची संख्या 57 टक्क्यांनी वाढली आहे. एकीकडे बाधितांच्या प्रमाणात मृत्यूदरात घट झाली असली तरी मृतांच्या संख्येत मात्र या महिन्यात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यात राज्यात सध्या सर्वाधिक मृत्यूदर सोलापूरचा असून जवळपास 4 टक्के इतका आहे. तर सिंधुदुर्ग, परभणी, नंदुरबार, अहमदनगर येथे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल भिवंडी नगरपालिका(3.77 टक्के), सांगली(2.86 टक्के), कोल्हापूर(2.83 टक्के ), सिंधुदुर्ग (2.62 टक्के), मालेगाव(2.28 टक्के), उस्मानाबाद (2.30 टक्के), रत्नागिरी(2.15 टक्के), नांदेड (2.27 टक्के), सातारा(2.19 टक्के) आणि मुंबई(2.02 टक्के) यांचा समावेश आहे.