
अजय बिवडे, संपादक, विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी या निवडणुकीत भाजपचे आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपकडून बंगालमध्ये पद्धतशीरपणे ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना गळाला लावले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई झाली होती. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.
आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये २१३ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तर ‘अब की बार २०० पार’ च्या घोषणा करणारा भाजप १०० जागांचा टप्पाही ओलांडू शकला नाही. ७७ जागेच्या विजयासह भाजपला दोन अंकी जागांवरच समाधान मानावे लागले. याहीपलीकडे काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, मात्र त्यांनी ममता बँनर्जी यांच्या विजयातच आपला विजयी जल्लोष साजरा केलेला आहे़ कोरोना संकटामुळे सर्वच राजकिय पक्षांनी प्रचार सभा घेण्याचे टाळले़ अशातच सर्वप्रथम ममता बँनर्जी यांनी आपल्या सर्व सभा रद्द केलेल्या होत्या, त्यामुळे लोकहितार्थ घेतलेल्या त्यांच्या या निर्णयाचे सर्व जनतेने स्वागतच केले़ मात्र त्यानंतरही भाजपवर मोठ्या प्रमाणात टिका होत राहीली़ याहीपलीकडे हिंसक घटनांनीही जनतेच्या मनात रोष होताच़ सोबतच प्रसारमाध्यमांवरही टिकेची झळ उलटलेली होती़ सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेनेही आपला रोष व्यक्त करीत ‘ कोरोनामुळे सारेच काही थांबले, मात्र निवडणुका कोरोनाही थांबवु शकला नाही’ अशी टिप्पणी करण्यात येत होती़ मात्र आला निवडणुकांनंतर देशात कोरोना रोगावर प्रतिबंध येणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे़

