गोपाल कडुकर, मुख्य संपादक, विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – देशात गेल्या दोन महिन्यांपासून पाच राज्यांच्या निवडणुकांची मोठी चर्चा सुरू होती. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या ठिकाणी विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्याचे निकालही लागले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा विजय मिळाला असून केरळमध्ये देखील पुन्हा डाव्यांचीच सत्ता आली आहे. तामिळनाडूमध्ये मात्र सत्तापालट झाला आहे. दुसरीकडे आसाम या छोट्या राज्यात आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात भाजपाला सत्ता राखण्यात यश आले आहे. यासर्व निवडणुकांमध्ये प़ बंगालची निवडणुक ही भाजपसाठी ‘श्रेष्ठत्वाची लढाई’ होती़ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अनेक सभा प़ बंगालमध्ये झाल्या़ या सोबतच देशातील अनेक केंद्रीय मंत्री, खासदार व आमदारांच्या फौजेसह कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात प़ बंगालवर लक्ष केंद्रीत करून होते़ मात्र ममता बँनर्जी यांच्या पक्षालाच जनतेने कौल दिला़ प़ बंगालमध्ये ममता दिदिंच्या तृणमुल काँग्रेसला बहुमत मिळाले असले तरी ममता बँनर्जी यांंना मात्र त्यांच्या मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला़ नंदीग्राम विधानसभा क्षेत्रातून भाजपच्या सुवेंद्रु अधिकारी यांनी त्यांना १७३६ मतांनी पराभूत केले़ त्यामुळे बंगालच्या राजकारणात ‘गड आला, पण सिंह गेला’ असेच म्हणावे लागेल़ पराभूत होऊन सुद्धा त्या तिसºयांदा प़ बंगालच्या मुख्यमंत्री होतील हे मात्र नक्की़

