Home Breaking News रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड

0
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, भंडारा : कोरोना आजारावर परिणामकारक ठरणा-या रेमडेसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करुन विक्री करणा-या सहा जणांना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून चार रेमडेसीवर इंजेक्शन, इंजेक्शनच्या रिकाम्या कुपी, खोके, मोबाईल, दुचाकी व रोख रक्कम असा एक लाख ७0 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अनिकेत ढवळे (३0) रा. सिव्हील लाईन भंडारा, बबन मन्साराम बुधे (३५) रा. म्हाडा कॉलनी भंडारा, सचिन अशोक हुमने (२९) रा. म्हाडा कॉलनी भंडारा, खुशबू विजय इलमकार (२२) रा. विदर्भ हाऊसिंग कॉलनी भंडारा, करीश्मा तेजराम पारधी (२१) रा. विदर्भ हाऊसिंग कॉलनी भंडारा आणि आचल नागदेवते (२५) रा. भंडारा अशी आरोपींची नावे आहेत.
भंडारा जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना प्रादुभार्वाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या आजारामुळे मृत्यूदर मोठया प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसीवर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक कितीही पैसे खर्च करण्यासाठी तयार असतात. त्यातूनच रेमडेसीवर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ?ा प्रमाणात सुरू आहे. रेमडेसीवर इंजेक्शनचा काळा बाजार करुन सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी व जिवीताशी खेळत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिस अधीक्षक वसंत जाधव व अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी या टोळीचा पदार्फाश करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिले.
यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी सलग दोन आठवडे सापळा रचला. ३0 एप्रिल रोजी रेमडेसीवर इंजेक्शनची विक्री करणारी टोळी सक्रीय झाल्याची माहिती मिळाली. लागलीच एक पथक तयार करुन शहरातील मुस्लीम लायब्ररी चौक ते पोस्ट आॅफीस चौकाकडे रवाना करण्यात आले. एका व्यक्तीस १ लाख २0 हजार रुपये देऊन ४ रेमडेसीवर इंजेक्शनचा सौदा करण्यास सांगीतले. फोनवरुन सौदा पक्का झाल्यावर आरोपी बबन बुधे याने नियोजित ठिकाणी ४ रेमडेसीवर इंजेक्शन देण्याचे सांगितले. काही वेळाने मुस्लीम लायब्ररी चौक ते पोस्ट आॅफीस चौक दरम्यान इंजेक्शन घेण्यास गेले असता पोलिसांनी ४ रेमडेसीवर इंजेक्शनसोबत बबन बुधे, सचिन अशोक हुमने यास ताब्यात घेतले. त्यांची अधीक चौकशी केली असता त्यांनी ते इंजेक्शन दोन नर्सकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर दोन्ही नर्सच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरुन मोठया प्रमाणात औषधींचा साठा हस्तगत करण्यात आला.
आरोपी नर्सनी जादा दराने विकलेल्या औषाधांचे नगदी ९0 हजार रुपये, एक मोटार सायकल व तिन एंड्रॉईड मोबाईल असा एकूण १ लाख ७0हजार ९६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत दोन्ही नर्सना विचारणा केली असता अनिकेत रंभाड ढवळे याच्या मदतीने रेमडेसीवर इंजेक्शनचा गोरखधंदा चालवत असल्याचे सांगितले. या प्रकरणी आचल नागदेवते हिलाही अटक करण्यात आली आहे.
सहाही जणांविरुद्ध भंडारा पोलिस स्टेशन येथे कलम १८८,४२0,३४ भादंवि, परीषीष्ट औषध नियंत्रण किंमत आदेश २0१३, सहकलम ३(२) (क),७ जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५, सहकलम १८(क),२७ (ख) (२) सौदर्य प्रसाधन कायदा १९९९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सर्व आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कार्यवाही पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक विवेक राऊत, वामन ठाकरे, सुधिर मडामे, तुळशिदास मोहरकर, विजय राऊत, गेंदलाल खैरे, नितीन शिवनकर, क्रिष्णा बोरकर, नंदकिशोर मारबते,अमोल खराबे, पंकज भित्रे, बबिता चौरे, उमेश्?वरी नाहोकर आदीनी केली. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विवेक राऊत करीत आहेत.