‘नवरा’ बनला ‘रावण’ हुंड्याची मागणी करून, सासू-नणंदेने केला सूनबाईचा खून

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8717*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

141

‘नवरा’ बनला ‘रावण’ हुंड्याची मागणी करून, सासू-नणंदेने केला सूनबाईचा खून

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, भंडारा : कोब्रा बटालियन जवानाच्या सांगण्यावरुन त्याच्या आई व बहिणीने हुंड्यासाठी जवानाच्या पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना चितापूर येथील कोब्रा बटालियन कॅम्पमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी कोब्रा बटालियनचा जवान, त्याची आई व बहिणीविरुद्ध कारधा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भारती रायन्ना नावी (२१) असे मृत महिलेचे नाव आहे. रायन्ना शिवरुद्र अप्पा नावी (२६), शोभा शिवरुद्र नावी (५४) आणि रुपा शिवरुद्र नावी (१८) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी तालुक्यातील परकन्नाहेट्टी येथील रहिवासी आहेत.
भंडारा तालुक्यातील चितापूर येथे कोब्रा बटालियन आहे. या बटालियनमध्ये कार्यरत जवान रायन्ना नावी हा सध्या छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे कर्तव्यावर आहे. तर त्याची पत्नी भारती, आई शोभा आणि बहिण रुपा हे चितापूर येथील सदनिकेत राहतात. २९ एप्रिल रोजी भारती हिचा मृतदेह सदनिकेत आढळून आला होता. भारतीच्या मृत्यूमुळे अनेक शंकांना उधान आले होते. दरम्यान, रायन्ना याच्या सांगण्यावरुनच त्याची आई शोभा आणि बहिण रुपा यांनी हुंड्यासाठी भारतीचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. तसेच मारपिट करुन तिचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले.
याप्रकरणी १ मे रोजी सुनील नागप्पा हम्पन्नावर (४३) रा. बसवनगल्ली जि. बेळगाव (कर्नाटक) यांच्या तक्र ारीवरुन कारधा पोलिसांनी रायन्ना नावी, शोभा नावी, रुपा नावी यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३0२, ३0४ (ब), ५0६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक परशुरामकर करीत आहेत.