Home Breaking News सांची जीवने यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके पुरस्कार

सांची जीवने यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके पुरस्कार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8712*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

113 views
0

सांची जीवने यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके पुरस्कार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीप्रीत्यर्थ दरवर्षी घेतल्या जाणा-या आंतरराष्ट्रीय दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यात नागपूरची नाट्य-सिने कलावंत सांची जीवने हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे. नागपूर येथील व्हीएमव्ही कॉलेजमध्ये सांची सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. नागपूर येथे गतवर्षी निर्मित पैदागीर या मराठी चित्रपटातील प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. स्विर्त्झलँड, स्पेन, कॅनडा, वङ, तुर्की, चीन, र्जमनी, भारत आणि इतर काही देशांमधून ३१0 चित्रपटांचा अंतिम नामांकनामध्ये समावेश होता. याआधी फिल्म डिव्हिजनचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपटाचा पुरस्कारदेखील या चित्रपटाला मिळाला आहे. याशिवाय विविध चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटास पुरस्कार आणि नामांकने मिळाली आहेत. पैदागीर या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक संजय जीवने असून गतवर्षी नागपूर येथील कलावंतांना घेऊन सम्मा दिठ्ठी फिल्म्सने पैदागीर चित्रपटाची निर्मिती केली, हे विशेष.