Home Breaking News संशयाचे भूत मनात संचारले,पतीने पत्नीवर अ‍ॅसीड फेकले

संशयाचे भूत मनात संचारले,पतीने पत्नीवर अ‍ॅसीड फेकले

0
संशयाचे भूत मनात संचारले,पतीने पत्नीवर अ‍ॅसीड फेकले

संशयाचे भूत मनात संचारले,पतीने पत्नीवर अ‍ॅसीड फेकले

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,पुणे : चारित्र्याच्या संशयवावरून पतीनेच पत्नीवर अँसीड हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घटली आहे. ही बोपदेव घाटात घडली असून अँसीड हल्ला करणा-या पतीवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश शिरपत धुमक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव असून पत्नीनेच याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिनेश शिरपत धुमक आणि फिर्यादी हे पती पत्नी असून सकाळी दुचाकीवरून बोपदेव घाटात दिनेशने पत्नीला नेले होते. त्यावेळी त्याने मध्येच गाडी थांबवली आणि तिच्यावर संशय घेऊन कामाचे ठिकाण दाखविण्याची जबरदस्ती पत्नीवर केली. यावेळी तिने तिच्या कामाचे ठिकाण दाखविण्यास नकार दिला. यावर दिनेशने तिला, तू कशी काम करते तेच बघतो? अशी धमकी दिली. तसेच मला तुझा चेहरा पाहायचा आहे, असे म्हणत तिच्या चेह-यावरील मास्क खाली करण्यास सांगितले.
त्यावेळी दिनेशने बाटलीतून आणलेले अँसीड पत्नीच्या तोंडावर आणि अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. त्याने केलेल्या अँसीड हाल्यात त्याच्या पत्नीच्या डाव्या डोळ्याच्या वरती व डाव्या दंडावर भाजुन जखम झाली. याप्रकरणी फियार्दी पत्नीने पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक छाया गपाट करत आहेत. दरम्यान आरोपी दिनेशला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
फियार्दी आणि आरोपी हे मुळचे कोकणातील असून आरोपी हा फिल्टर दुरूस्तीचे काम करतो. तर फियार्दी ही घरगुती काम करते. आरोपीचे पहिले लग्न झाले असून त्याने फियार्दीच्या पतीच्या निधनानंतर तिच्यासोबत विवाह केला होता. परंतु, आरोपीला तिच्या चारित्र्यावर संशय असल्याने अँसीडने हल्ला करत तिला गंभीर जखमी केले.