Home Breaking News त्रास देत होती सासू जावयाशी रोज भांडून भांडणाला कंटाळून जावयाने सासूचा केला खून

त्रास देत होती सासू जावयाशी रोज भांडून भांडणाला कंटाळून जावयाने सासूचा केला खून

0
त्रास देत होती सासू जावयाशी रोज भांडून  भांडणाला कंटाळून जावयाने सासूचा केला खून

त्रास देत होती सासू जावयाशी रोज भांडून
भांडणाला कंटाळून जावयाने सासूचा केला खून

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, पुणे : बिबवेवाडी परीसरात शेळके वस्तीत रोजच्या भांडणाला कंटाळून जावायाने सासूचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जावई आसिफ दस्तगीर आत्तार यास बिबवेवाडी पोलीसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू व जावई यांच्यात होत असलेल्या भांडणाला कंटाळून जावयाने सासू अनारकली महंमद तेरणे हिचा ओढणीने गळा आवळून खून केला.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जावई आसिफ दस्तगीर आत्तार, सासू अनारकली महंमद तेरणे आणि मेव्हनी मौलाली मंजलापुरे हे सर्व मूळ कर्नाटक राज्यातील रहिवासी आहेत. व्यवसाय उद्योगांच्या अनुषंगाने काही दिवसांपासून हे सर्व जन बिबवेवाडीत शेळके वस्तीत राहत होते. मात्र त्याने आपल्या बायकोला कर्नाटकात सोडले होते. जावाई असिफ हा मिळेल ती कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. दरम्यान घरात किरकोळ कारणावरून त्याचे पत्नी आणि सासू यांच्याबरोबर दररोज भांडण व्हायचे. मात्र, शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाली. यात आरोपीने रागाच्या भरात सासूला मारहाण करत ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर मेव्हनी मौलाली मंजलापुरे यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी दिली आहे. त्याप्रमाणे घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास पथकातील पोलिस अधिका-यांना तपासाचे आदेश दिले. तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी असिफ अत्तार याला अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश उसगांवकर करत आहेत.