कोरोनाचे आणखी आठ नवे प्रकार आढळले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8697*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

214

कोरोनाचे आणखी आठ नवे प्रकार आढळले

विदर्भ वतन न्यूज पोर्टलवृत्तसंस्था/ नवी दिल्ली- कोरोनाचे आणखी आठ वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. यामुळे पुढची लाट नेमकी कशी असेल याचा अंदाज आतापासून बांधता येत नाही. मात्र हे सर्व रोखण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण होणे आवश्यक असल्याचे मत शास्त्रज्ञांनी मांडले. दुसर्‍या लाटेचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांना पुरेशी माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे याबाबत ठोस काही सांगणे शक्य नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये उपलब्ध झालेल्या माहितीवरून दुसरी लाट तरुणांना अधिक घातक असल्याचे दिसते. मात्र आताच तसे म्हणता येणे शक्य नाही. यासाठीच देशातील ४00 शास्त्रज्ञांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले असल्याचेही सांगण्यात आले.
लसीमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जेणेकरून आपण कोरोनाविरोधी लढ्यासाठी आणखी सक्षम होऊ शकतो, आत्तापयर्ंतच्या पाहणीत लसीचा प्रभाव आठ महिन्यांपयर्ंत राहत असल्याचे समोर आले आहे. पुढे तो प्रभाव किती काळ टिकेल यावर अद्याप संशोधन सुरू आहे. सध्या कोणत्या कंपनीची लस घ्यावी यावरून विविध चर्चा सुरू आहेत. याबाबत विचारले असता, देशात सध्या ज्या दोन लसी आहेत त्या दोन्ही प्रभावी असल्याची पुरेशी माहिती उपलब्ध आहे. यामुळे ज्या लसी आता उपलब्ध आहेत त्या लवकरात लवकर घेणे आवश्यक आहे. परदेशातून आलेल्या लशींची सुरुवातीला मोजक्या भारतीयांवर चाचणी होईल त्यानंतरच ती सर्वांसाठी खुली केली जाईल. अर्थात या लसीआंतरराष्ट्रीय मानकांत उत्तीर्ण होऊन आलेल्या असल्यामुळे देशातील चाचणी लवकर पूर्ण होईल, असेही सांगण्यात येत आहे.
कोरोना हवेतून पसरतो ही बाब काही महिन्यांपूर्वी शास्त्रज्ञांच्या लक्षात आली होती. मात्र त्यावर अधिक संशोधन आवश्यक होते. ते पूर्ण झाल्यावर असे लक्षात आले की कोरोनाबाधित व्यक्ती जेव्हा संवाद साधते तेव्हा तिच्या तोंडातून बाहेर येणारे जाडे तुषार जमिनीवर पडतात पण काही बारिक तुषार हे हवेत तरंगत राहतात आणि ते दुसर्‍याच्या शरीरात शिरकाव करतात. हा प्रकार विशेषत: बंद खोलीत होतो. यामुळे घरात हवा खेळती राहणे महत्त्वाचे आहे. तसेच आपण जेव्हा कोणाच्या घरी जातो किंवा बाहेर वावरतो तेव्हा दोन मास्क आवश्यक आहेत. एक सर्जिकल मास्क आणि त्यावर कापडी मास्क असावा. एन ९५ असेल तर एकच मास्क पुरेसा असल्याचेही यावेळी शास्त्रज्ञांनी सांगितले. गरोदर महिला आण लहान मुलांवर लशीची चाचणी झालेली नाही. यामुळे त्यांचे लसीकरण होत नाही. मात्र त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्यांनी वेळेवर लसीकरण पूर्ण करणे आवश्यक. लसीकरणाचा मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. याबाबतचे व्हायरल मेसेजेस चूक आहेत.