Home Breaking News पाच राज्यात कोण जिंकलं, कोण हरलं !

पाच राज्यात कोण जिंकलं, कोण हरलं !

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8693*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

53 views
0

पाच राज्यात कोण जिंकलं, कोण हरलं !

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, मुंबई – देशातील आजचं वातावरण निवडणुकांच्या निकालांचा (Assembly Election Results) ठरला. पश्चिम बंगाल (West Bengol), आसाम (Assam), केरळ (Keral), तामिळनाडू (Tamilnadu) आणि पुद्दुचेरी (Pondicherry) या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या पाचही ठिकाणी विविध निकाल हाती आली असून काही ठिकाणी  सत्तांतर झाले आहे तर काही ठिकाणी बहुमत मिळून जुनेच सत्ताधारी विराजमान होण्याची शक्यता आहे. खाली दिलेली आकडेवारी ही सायंकाळी ७ वाजेपर्यंतची असून या बदल होण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये गड आला पण सिंह गेला

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांवर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. याठिकाणची निवडणूक स्पष्टपणे तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी राहिली. त्यामुळे याठिकाणी सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. भाजपकडून या निवडणुकीसाठी प्रचंड जोर लावण्यात आला होता. मात्र, याठिकाणी तृणमूल काँग्रेसने विजयाची हॅटट्रिक केली आहे. मात्र 292 विधानसभा सदस्य असलेल्या या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाच नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, संध्या. 6.30 वाजेपर्यंतच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये 292 पैकी तृणमूलला 216, भाजप 73, काँग्रेस 00 आणि अन्य 03 जागांवर आघाडीवर होते. बंगालमध्ये बहुमतासाठी 147 जागांची गरज आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने 200 पेक्षा जास्त जागा मिळवून एकहाती सत्ता स्थापन खेचून आणली आहे.

बंगालमधील पक्षीय बलाबल – 2021 (आघाडी) (West Bengal Election Final result 2021)

  • तृणमूल काँग्रेस -216
  • काँग्रेस -00
  • डावे – 03
  • भाजप – 73
  • एकूण – 292

बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)

  • तृणमूल काँग्रेस -219
  • काँग्रेस -23
  • डावे – 19
  • भाजप – 16
  • एकूण – 294

आसाममध्ये भाजपने गड राखला (Assam Election Final result 2021)

आसाम विधानसभेच्या 126 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. आसाममध्ये भाजपला 79, काँग्रेसला 46 आणि अन्य 1 अशा जागांवर आघाडी मिळाली.

आसामधील पक्षीय बलाबल – 2021 (आघाडी)  

  • भाजप – 79
  • काँग्रेस – 46
  • अन्य – 1
  • एकूण – 126

तामिळनाडूमध्ये सत्ताबदल (Tamil Nadu Election Final result 2021) 

तामिळनाडू विधानसभेत  मोठा उलटफेर झाला आहे. सत्ताधारी AIDMK ला मोठा झटका बसला आहे. DMK ने एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल केली आहे. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणूक झाली. DMK ने यापैकी 155 जागांवर आघाडी मिळवली तर सत्ताधारी AIDMK ला 78 जागांवर आघाडी घेता आली. अन्य 1 असं चित्र तामिळनाडूत पाहायला मिळालं.

तामिळनाडूतील पक्षीय बलाबल 2021 

  • DMK –  155
  • AIDMK – 78
  • अन्य – 1
  • एकूण – 234

केरळमध्ये डाव्यांनी गड राखला (Kerla Election Final result 2021)

केरळमध्ये सत्ताधारी LDF ने पुन्हा डाव मांडला आहे. एक्झिटपोलमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या LDF ने प्रत्यक्ष मतमोजणीतही आपला दबदबा कायम राखला.  140 जागांच्या केरळ विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी LDF ने 87, काँग्रेसने 46, भाजप 6 आणि अपक्ष-इतर 01 असं चित्र पाहायला मिळालं.

केरळमधील पक्षीय बलाबल 2021 

  • LDF – 87
  • काँग्रेस –  46
  • भाजप – 06
  • इतर – 01
  • एकूण – 140

पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक निकाल (Puducherry Election final result 2021 )

पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसला झटका बसला आहे. 30 सदस्य संख्या असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत भाजपप्रणित एनडीएने सत्ता स्थापनेच्या दृष्टीने पावलं टाकली. पुद्दुचेरीमध्ये NDA ला 15, काँग्रेसला 10, इतर 5

पुद्दुचेरीमधील पक्षीय बलाबल 2021

  • NDA -15
  • काँग्रेस – 10
  • इतर – 05
  • एकूण 30