सुनील मानेला 13 मेपर्यंत न्यायलयीन कोठडी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8666*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

139

सुनील मानेला 13 मेपर्यंत न्यायलयीन कोठडी

-उद्योजक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरण

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,मुंबई : उद्योजक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आज सुनील माने यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सुनील माने यांना 13 मे पर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. तसेच माने यांच्या कुटुंबाने त्यांच्या जीवितास धोका असल्याचा दावा केल्यानंतर न्यायालयाने सुनिल माने यांना कारागृहात सुरक्षा पुरवण्याचे
तोंडी आदेश दिले आहेत.
ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सुनिल माने यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली. त्याला आज न्यायालयात हजार करण्यात आले होते. यावेळी सुनील माने याचे नातेवाईकसुद्धा न्यायालयात हजर होते. या नातेवाईकांनी निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो . त्याने त्यांच्या कर्तव्यादरम्यान अनेक गुंडावर कारवाई केली आहे. त्यामुळे कारागृहात गेल्यावर गुंडांकडून धोका असल्याचा दावा केला. त्यानंतर ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर सुनील याला कोठडीमध्ये संरक्षण द्यावं, असे तोंडी आदेश न्यायालयाने दिले.