पंढरपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8657*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

180

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,पंढरपूर – पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त जागी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता पंढरपूर येथील शासकीय गोदामात सुरू झाली आहे. कोरोनाच्या संकटात 24 ऐवजी एकूण 38 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होत असल्याने निकाल येण्यास उशीर होणार असला तरी मतमोजणीचा कल दुपारी बारापर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत एकूण 19 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. मात्र मुख्य लढत ही भाजपाचे समाधान अवताडे आणि राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्यात होणार आहे.

या निवडणुकीत एकूण 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले होते. याशिवाय ८० वर्षावरील व दिव्यांग आदी 3252 मतदारांनी पोस्टाने मतदान केले आहे. तसेच 73 सैनिकांनीदेखील पोस्टाने आपला मतदानाचा हक्क बजावला असून आज सकाळी आठपर्यंत सैनिकांची येणारे पोस्टाची मतदान गृहीत धरण्यात आली आहेत. आज सकाळी आठ वाजता 14 टेबलांवर पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर याचवेळी इतर 2 टेबलांवर पोस्टाची मते मोजली जाणार असून 6 टेबल राखीव ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, गेल्या तीन निवडणुकांपासून सुरु असलेला मंगळवेढ्याच्या 35 गावाच्या पाण्याचा प्रश्न याही निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरल्याने मंगळवेढा भागात याचा प्रभाव मतमोजणीत दिसून येणार आहे. तसेच आज मतमोजणीवेळी कोणताही अडथळा येऊ नये यासाठी परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.