हा महाराष्ट्र !
छान रे अपुला महाराष्ट्र
जणू भासतो विस्तीर्ण राष्ट्र
भीमा गोदा कृष्णा वा मांजरा
बारमाही वाहे जलधारा
रैगूर मृदा ही काळी आई
पोटी फुलण्याची सदा घाई
उंच उभी डोंगर-पठारे
त्यात लिप्त खाणींची कोठारे
उद्योंगांना इथे फार वाव
कष्टक-यांची शमते हाव
संत कवी पुढा-यांची भूमी
कतृर्त्वाची दिसे खुमखुमी
सर्वाना समान वागणूक
ऐसी कुठे ऐकण्याची चुणूक!
आधुनिकतेचा चाले वसा
हा महाराष्ट्र महान असा
-प्रभाकर तांडेकर,‘प्रदत्त’
52-ब, साईनगर,गणेश अपार्टमेंटजवळ,
दिघोरी नाका,नागपूर-440034
मो. -09421803498,
-09766278824

