Home अहमदनगर आयकॉन फाउंडेशन रुग्णांच्या मदतीला

आयकॉन फाउंडेशन रुग्णांच्या मदतीला

0
आयकॉन फाउंडेशन रुग्णांच्या मदतीला

आयकॉन फाउंडेशन रुग्णांच्या मदतीला

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, श्रीरामपूर- प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाची स्थिती दिवसागणिक वाढत चाललेली दिसत आहेत, दररोजची रुग्णवाढ आणि त्याच सोबत रुग्णांचे होणारे हाल. स्थानिक प्रशासन व रुग्णालये यांच्याकडून सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत मात्र दररोज होणा-या रुग्ण वाढीमुळे त्यात कुठेतरी कमतरता येणे साहजिक आहे. अशात रुग्णांच्या व रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीला श्रीरामपुरातील आयकॉन फाउंडेशन धावून आले आहे.
श्रीरामपूर शहरातील आयकॉन फाउंडेशनच्या वतीने गेल्या काही काळा पासून कोरोना रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना जेवण पुरविण्याचे काम केले जाते आहे. आणि विशेष म्हणजे हे जेवण पूर्णत: मोफत दिले जाते आहे. दुपारचे आणि रात्रीचे जेवण डिस्पोजेबल डब्यात भरून हे डबे रुग्णांना रुग्णालयात व गरज असल्यास रुग्णांच्या कुटुंबियांना त्यांच्या घरी जाऊन दिले जातात. हे सर्व करत असताना सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन व सुरक्षेची पूर्ण काळजी सदर फाउंडेशनच्या वतीने घेतले जात आहे.
श्रीरामपुरातील आयकॉन फाउंडेशनच्याया कामाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, तेवढ्याच प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांना मदत देखील केली जात आहे. आयकॉन फाउंडेशनच्या माध्यमातून श्री. विशाल पवार, प्रसाद देशमुख, दत्तात्रय पाठारे, राजेश मोरे यांच्यासह अनेक तरुण आपले योगदान देत आहेत.आयकॉन फाउंडेशन रुग्णांच्या मदतीला
(श्रीरामपूर) प्रतिनिधी, श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाची स्थिती दिवसागणिक वाढत चाललेली दिसत आहेत, दररोजची रुग्णवाढ आणि त्याच सोबत रुग्णांचे होणारे हाल. स्थानिक प्रशासन व रुग्णालये यांच्याकडून सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत मात्र दररोज होणा?्या रुग्ण वाढीमुळे त्यात कुठेतरी कमतरता येणे साहजिक आहे. अशात रुग्णांच्या व रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीला श्रीरामपुरातील आयकॉन फाउंडेशन धावून आले आहे.
श्रीरामपूर शहरातील आयकॉन फाउंडेशनच्या वतीने गेल्या काही काळा पासून कोरोना रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना जेवण पुरविण्याचे काम केले जाते आहे. आणि विशेष म्हणजे हे जेवण पूर्णत: मोफत दिले जाते आहे. दुपारचे आणि रात्रीचे जेवण डिस्पोजेबल डब्यात भरून हे डबे रुग्णांना रुग्णालयात व गरज असल्यास रुग्णांच्या कुटुंबियांना त्यांच्या घरी जाऊन दिले जातात. हे सर्व करत असताना सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन व सुरक्षेची पूर्ण काळजी सदर फाउंडेशनच्या वतीने घेतले जात आहे.
श्रीरामपुरातील आयकॉन फाउंडेशनच्या या कामाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, तेवढ्याच प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांना मदत देखील केली जात आहे. आयकॉन फाउंडेशनच्या माध्यमातून श्री. विशाल पवार, प्रसाद देशमुख, दत्तात्रय पाठारे, राजेश मोरे यांच्यासह अनेक तरुण आपले योगदान देत आहेत.