
असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज इंडिया नागपूरतर्फे कोविड विषयक माहिती हेल्पलाईन सुरु
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर- कोविड 19 विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून कोविड रुग्णाचे हाल होत आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाइकांना मदत म्हणून असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज इंडियातर्फे ( ए.पी.आय.ई. ) नागपूरच्या वतीने हेल्पलाईन चालू करण्यात आली आहे. समाज माध्यमातून बरेच मदतीबाबत संदेश वेगवेगळ्या ग्रुप द्वारे फिरत असतात पण ते खरे नसतात किंवा जुने असतात. ह्या सर्व संदेशाची पडताळणी करूनच संघटनेचे स्वयंसेवक गरजूना अचूक माहिती उपलब्द्ध करून देत आहेत. लॅपटॉप व इंटरनेट च्या माध्यमातून, कोविड दवाखाने, प्राणवायू उपलब्ध असलेले बेड, रक्तद्रव्य दाते ,अंबुलन्सबाबत माहिती संघटनेच्या जिल्हा स्तरीय व राज्य स्तरीय ग्रुप मध्ये टाकून माहिती मिळविली जाते आणि संबंधितांना ती कळविण्यात येते .
डॉ प्रशांत बागडे, डॉ सोनल पंचभाई फोनद्वारे वैद्यकीय सल्ला सुद्धा या हेल्पलाईनद्वारे देत आहेत . सदर हेल्पलाईन क्रमांक हा 9822201150 आणि 88058 37192 असून या केंद्राच्या कामाची जबाबदारी रितेश गोंडाने, रिमोदस खरोळे, भावना जनबंधु, प्रा विलास तेलगोटे, मिलिंद देउलकर, डॉ भावना वानखडे, लकी राठोड, अक्षय डोईफोडे, कल्पना चिंचखेडे, मृणालिनी मानवटकर, संतोष वानखेडे , प्रतिमा पथाडे व इतर कार्यकर्ते पार पाडत आहे. संघटनेचे इतर राज्यात असेलेले नेटवर्क सुध्दा ह्या कामात उपयोगी पडत आहे.
विशेष म्हणजे , मागील वर्षी 24 मार्च रोजी घोषित झालेल्या लॉकडॉऊन नंतर हातमजुरी करणाऱ्या मजुरांचे व एप्रिल 2020 मध्ये शहरातून गावांकडे स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे हाल अपेष्टा कमी करण्यात नागपूर तसेच विदर्भातील इतर जिल्हे व इतर राज्यात असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव एम्प्लॉइस इंडिया या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती .

