Home Breaking News कोरोना रुग्णासाठी नारायण दाभाडकर यांनी खरंच बेड सोडला? काय खरं काय खोटं?

कोरोना रुग्णासाठी नारायण दाभाडकर यांनी खरंच बेड सोडला? काय खरं काय खोटं?

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8559*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

76 views
0

कोरोना रुग्णासाठी नारायण दाभाडकर यांनी खरंच बेड सोडला? काय खरं काय खोटं?

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : आरएसएसचे स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांनी स्वत:ला दिलेला बेड दुस-या रुग्णाला देऊ करून त्याचा जीव वाचवला. मात्र काही दिवसांनी नारायण दाभडकर यांचा मृृत्यू झाला. दाभाडकर यांच्या या त्यागाबद्दल सोशल मीडियावर प्रचंड कौतुकही केलं जात आहे. मात्र, त्याचबरोबर या प्रकरणाबाबत ब-याच उलटसुलट चर्चाही सुरू आहेत. नारायण दाभाडकर हे उपचारांसाठी रुग्णालयात आलेच नव्हते असं म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?
८५ वर्षीय नारायणराव दाभाडकर यांचं कोरोनामुळे राहत्या घरी निधन झालं. कोरोना रुग्णासाठी त्यांनी बेड सोडला असं सांगितलं जात आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विट करत नारायणराव दाभाडकर यांनी दुस-या रुग्णासाठी बेड नाकारला अन मृत्यूला कवटाळलं अशी माहिती पोस्टमध्ये दिली आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेकजण नारायण दाभाडकर यांचा फोटो शेअर करत कौतुक करत आहेत.

शिवराज सिंग चौहान यांचं ट्विट काय?
शिवराज सिंग चौहान यांनी नारायण दाभाडकर यांचा फोटो पोस्ट केला असून लिहिलं आहे की, मी ८५ वषार्चा झालो आहे. संपूर्ण आयुष्य पाहिलं आहे, पण जर त्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला तर तिची मुलं अनाथ होतील. यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचवणं माझं कर्तव्य आहेह्व असं सांगत करोनाबाधित आरएसएस स्वयंसेवक नारायणजींनी आपला बेड त्या रुग्णाला दिला.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, दुस-या व्यक्तीच्या जीवाचं रक्षण करताना नारायणजी तीन दिवसांमध्ये जग सोडून गेले. समाज आणि राष्ट्राचे खरे सेवक असाच त्याग करतात. आपल्या सेवेला सलाम!, तुम्ही समाजासाठी प्रेरणादायी आहात.

व्हायरल आॅडिओ क्लिपमधून काय उघडलं?
एकीकडे सोशल मीडियावर नारायण दाभाडकर यांच्याबद्दल पोस्ट व्हायरल होत असताना दुसरीकडे एक आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये नारायण दाभाडकर यांच्याबद्दल करण्यात आलेला दावा खोटा असल्याचं सांगितलं जात आहे. या आॅडिओ क्लिपमध्ये पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिवराम ठवरे नागपूरच्या इंदिरा गांधी रुग्णालयाचे अधीक्षक अजय प्रसाद यांच्यासोबत संवाद साधताना ऐकू येत आहे.

आॅडिओ क्लिपलमधील संवाद
शिवराम ठवरे : गुड मॉर्निंग सर, मी पुण्याहून बोलतोय. तुमच्या मेडिकल इन्सिट्यूटच्या नावाने नारायण दाभाडकर यांच्यासंदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे.

अजय प्रसाद : एक तर अशी पद्धत आपल्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या नावाचा रुग्ण आमच्याकडे दाखल झालेला नाही. तिसरं म्हणजे एका पेपरमध्ये आलं आहे त्याप्रमाणे नागपूर पालिकेच्या एका रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये हा रुग्ण गेला होता असं सांगण्यात आलं आहे.

शिवराम ठवरे : म्हणजे तुमच्या इंदिरा गांधी रुग्णालयात हे झालेलं नाही.

अजय प्रसाद : आमच्याकडे असं नाही, पण पेशंटकडून बेड घेण्याची अशी पद्धत कुठेच नाही. आम्ही कंफर्म केलं असून अशा नावाचा कोणताही रुग्ण आमच्याकडे नव्हता.

शिवराम ठवरे : नागपूर पालिकेच्या साईटवर या हॉस्पिटलची माहिती मिळेल ना म्हणजे.

अजय प्रसाद : हो तिथे मिळून जाईल.पेपरमध्येही सविस्तर माहिती आहे. आम्हीदेखील आज सकाळी पाहिलं.

शिवराम ठवरे : अशा पद्धतीने करोना रुग्ण कसा काय घरी जाऊ शकतो म्हणून आम्हीदेखील गोंधळून गेलो होतो. बाहेर जरी धडपड सुरु असली तरी आतमध्ये दाखल रुग्णाला कसं कळणार?

अजय प्रसाद : हो बरोबर. अशी पद्धतच नाही.

सोशल मीडियावर या प्रकरणी उलटसुलट चर्चा होत असून आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार दाभाडकरांनी करोना रुग्णासाठी बेडचा त्याग केल्याचं दिसून येत नाही.