विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपुर – दोन हत्यांच्या आरोपासह अनेक गुन्ह्याच्य आरोपी असलेल्या कुख्यात रंजीत सफेलकर याच्या गुन्हेगारी मार्गाने निर्माण केलेल्या साम्राज्यावर आता शासनाने कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. नागपूर कामठी मार्गावरील राज महाल सभागृह येथे आज कारवाई करण्यात आली. या जमिनीवर अवैध कब्जा घेऊन रंजीत सफेलकर याने या सभागृहाची निर्मिती केलेली होती. पोलीस विभाग व आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने निर्माण केलेल्या बांधकामावर कारवाई करीत खंडणी व बळजबरी ने निर्माण केलेल्या अशा इतरही मालमत्तांवर कारवाई करण्यात येणार आहे संतोष आंबेकर यांच्या गुन्हेगारी विश्वाचा अशाच प्रकारे अंत करण्यात आला होता आता रंजीत सफेलकर याच्यावर झालेल्या कारवाईने गुन्हेगारी विश्वात खळबळ निर्माण झालेली आहे त्याच प्रकारे भविष्यात हाटे बंधू यांच्यावरही कारवाई होते काय याकडे सर्वांचे लक्ष आहे.

