Home आरोग्य लक्ष्मीनगर झोन अंतर्गत कोविड-19 लसीकरण नोंदणी केंद्र सुरू

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत कोविड-19 लसीकरण नोंदणी केंद्र सुरू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8559*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

243 views
0

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत कोविड-19 लसीकरण नोंदणी केंद्र सुरू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : लक्ष्मीनगर झोन अंतर्गत कोविड-19 लसीकरण नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक प्रमोद तभाने प्रभाग क्र.37 यांनी नागरिकांना लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे दिवसेनदिवस बाधितांची संख्या व कोरोनाने मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा भयंकर परिस्थितीत कोविड-19 प्रतिबंधात्मक लस घेणे प्रत्येक नागरिकासाठी गरजेचे झाले आहे असे नगर सेवक प्रमोद तभाने यांनी सांगीतले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच 1 मे पासून 18 वर्षावरील युवकांसाठी सुरू करण्यात येणा-या लसीकरण केंद्रावर सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळात युवकांनी जाऊन आपले नाव नोंदवावे व संधीचा लाभ घेण्याचे आवहनही तभाने यांनी केले.