Home Breaking News बाजारास जाते म्हणून मुलगी घरून निघाली अपहरण होऊन देहव्यापारच्या दलदलीत फसली

बाजारास जाते म्हणून मुलगी घरून निघाली अपहरण होऊन देहव्यापारच्या दलदलीत फसली

0
बाजारास जाते म्हणून मुलगी घरून निघाली अपहरण होऊन देहव्यापारच्या दलदलीत फसली

बाजारास जाते म्हणून मुलगी घरून निघाली
अपहरण होऊन देहव्यापारच्या दलदलीत फसली

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, वृत्तसंस्था/धनबाद : झारखंडमधील धनबादमध्ये खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एक मुलगी कोडरमा येथून खरेदीसाठी धनबादमधील हिरापूर येथे आली होती. त्याचवेळी दाम्पत्याने फूस लावून तिचे अपहरण केले. त्यानंतर अपहरणकर्त्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर या दाम्पत्याने तिला देहव्यापाराच्या दलदलीत ढकलले.
मिळालेल्या माहितीनुसार, बाघमरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयरामडीह येथे ही घटना घडली. एका घरावर छापा मारून पोलिसांनी मुलीची सुटका केली. त्याचवेळी घर मालक सोईम अन्सारी आणि त्याची पत्नी सलमा हे दोघे फरार झाले. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सलमाविरोधात तिच्या मोठ्या बहिणीने तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर रविवारी पोलिसांनी या दाम्पत्याच्या घरावर छापा मारला.
या कारवाई दरम्यान सलमाच्या घरात एक तरुणी सापडली. तिच्याकडे चौकशी केली असता, तिने सांगितले की, आठवडाभरापूर्वी सलमा आणि तिच्या पतीने धनबादच्या हिरापूर येथून तिचे अपहरण केले होते. तेथून त्यांच्या घरी आणले. गेल्या चार-पाच दिवसांपासून हे दाम्पत्य माज्याकडून जबरदस्ती देहव्यापार करून घेतात. विरोध केला तर दोघेही मारहाण करतात, अशी आपबिती तिने सांगितली. पोलिसांनी सलमाच्या घरातून आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत. पीडितेने पोलिसांना सांगितले की, ती आपल्या भावासोबत कोडरमा येथून खरेदीसाठी धनबादच्या हिरापूरला गेली होती. तिथे फूस लावून सलमा आणि तिचा पती, तसेच इतर दोन-तीन जणांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर जयरामडीह येथील आपल्या घरी आणले. तिला देहव्यापार करण्यास भाग पाडले. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.