Home Breaking News दिल्लीत पंचतारांकित अशोका हॉटेल केवळ कोरोनाग्रस्त जजेसकरिता राखीव! जनता संतप्त

दिल्लीत पंचतारांकित अशोका हॉटेल केवळ कोरोनाग्रस्त जजेसकरिता राखीव! जनता संतप्त

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8541*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

71 views
0

दिल्लीत पंचतारांकित अशोका हॉटेल केवळ कोरोनाग्रस्त जजेसकरिता राखीव! जनता संतप्त

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील पंचतारांकित अशोका हॉटेलच्या १०० खोल्या कोरोना सेंटर म्हणून राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्या दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी राखीव ठेवल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून भाजपनेही याला विरोध केला आहे.
दिल्लीत कोरोनाची परिस्थिती भयावह बनली आहे. दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असल्यामुळे रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे अवघड झाले आहे. असे असताना चाणक्यपुरीच्या एसडीएमने नोटीफिकेशन काढले आहे. त्यात त्यांनी दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश, सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अशोका हॉटेलमध्ये क्वारंटाईनची सोय केली असल्याचे म्हटले आहे. गेल्या महिन्यात जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात काही न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात हॉटेलमार्फत त्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. दिल्लीत रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे क्वॉरंटाईनची सुविधा वाढवण्याच्यादृष्टीने ही सोय करण्यात आली आहे. त्यासाठी हॉटेल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, रुग्णवाहिका, डॉक्टर, नर्स हा सर्व खर्च हा त्यांना स्वतःला करावा लागेल, असे त्यांनी आदेशात म्हटले आहे. मात्र यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून अशाप्रकारे रुग्णांमध्ये भेदभाव करण्यास भाजपने विरोध केला आहे.