अमरावती जिल्ह्याच्या सीमा बंद! तपासणीसाठी तपासणी नाके

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8535*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

352

अमरावती जिल्ह्याच्या सीमा बंद! तपासणीसाठी तपासणी नाके

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,अमरावती- कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अमरावती जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून तपासणीसाठी ठिकठिकाणी तपासणी नाके निर्माण करण्यात आले. अतिजोखमीच्या क्षेत्रातून प्रवासाला मर्यादा घालण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज सांगितले.
राज्यात कोविड विषाणूचा फैलाव कमी करण्यासाठी केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, उत्तराखंड या राज्यांना संवेदनशील क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. त्याबाबत रेल्वेस्थानकावर तपासणीसाठी यापूर्वीच पथके नियुक्त करण्यात आली आहेत. अनावश्यक प्रवासावर मर्यादा घालण्यात आल्या असून, ठिकठिकाणी तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल तिवसा व मोर्शी येथे भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तिवसा येथील पंचायत समितीत स्थापित कंट्रोल रूमला भेट देऊन त्यांनी दैनंदिन रुग्णस्थितीचा आढावा घेतला. तसेच, ग्रामीण रुग्णालयालाही भेट दिली. उपलब्ध खाटा, खाटा वाढविण्याची गरज पडल्यास आवश्यक सुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता याबाबत त्यांनी आढावा घेतला.