कोपरगावमधील भाजपचे माजी शहराध्यक्ष सुभाषचंद्र शिंदेंची आत्महत्या

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8521*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

196

कोपरगावमधील भाजपचे माजी शहराध्यक्ष सुभाषचंद्र शिंदेंची आत्महत्या

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,अहमदनगर- कोपरगावमधील भाजपचे माजी शहराध्यक्ष प्राध्यापक सुभाषचंद्र शिंदेंनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना आज सकाळी 10 वाजल्याच्या सुमारास घडली. त्यांच्या आत्महत्येमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली. सुभाषचंद्र शिंदे हे माजी खासदार स्वर्गीय सूर्यभान पाटील वहाडणे यांचे कट्टर समर्थक होते.
शिंदेंनी आपल्या खोलीतून बराच वेळ झाले बाहेर न आल्याने त्यांची सून वर्षा शिंदेंनी डोकावून पाहिले, त्यावेळी त्यांना शिंदेंनी पंख्याला दोरीच्या सह्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने कोपरगाव ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. खोलीची तपासणी केली असता त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली, मात्र तपासाचा भाग असल्याने त्याबद्दल अधिक माहिती देता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून, एक मुलगी, दोन नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, शिंदे हे कोपरगावमधील सोमय्या महाविद्यालयात प्राध्यापक होते. पंधरा वर्षांपूर्वी ते निवृत्त होते. ते भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जात. काही काळ त्यांनी कोपरगावचे पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून ही काम केले.