Home Breaking News परिचारिकेने चोरले १२ रेमडेसिवीर इंजेक्शन अटक होऊन जावे लागले अखेर पोलिस स्टेशन

परिचारिकेने चोरले १२ रेमडेसिवीर इंजेक्शन अटक होऊन जावे लागले अखेर पोलिस स्टेशन

0
परिचारिकेने चोरले १२ रेमडेसिवीर इंजेक्शन अटक होऊन जावे लागले अखेर पोलिस स्टेशन

परिचारिकेने चोरले १२ रेमडेसिवीर इंजेक्शन
अटक होऊन जावे लागले अखेर पोलिस स्टेशन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर,गडचिरोली : राज्यात रेमडेसीवर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असतानाही गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून १२ रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी गेल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील पल्लवी मेश्राम (३५) या आरोग्य परिचारिकेस नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, यासंदर्भात गडचिरोली पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.
प्राप्त माहितीनुसार परिचारिका पल्लवी मेश्राम हिने दोन आठवड्यापूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शन चोरून नागपूरच्या काळ्याबाजारात विकले. नागपूर येथे बेलतरोडी पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शन चोरांच्या टोळीचा पदार्फाश केला आहे. शुक्रवारी सायंकाळी बेलतरोडी पोलिसांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार करणा-या टोळीतील पाच आरोपींना जेरबंद केले होते. या टोळीकडून ७ रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत नागपूर येथील नगरसेविकेचा दीर असलेला मनोज कामडे आणि कंत्राटदार वाळके हे दोघे या टोळीचे सूत्रधार असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी आपला हिसका दाखवताच टोळीतील अतुल भीमराव वाळके (३६) रा. आयुर्वेदिक लेआॅउट नागपूर याने ही धक्कादायक माहिती दिली. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णायात कार्यरत असलेली आरोग्य परिचारिका पल्लवी मेश्राम ही वाळके याची मेव्हणी असून ती गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील आठ वषार्पासून कार्यरत आहे. पल्लवीने इंजेक्शन चोरले व वाळके याला दिल्याचे आरोपीने सांगितले. त्यानुसार नागपूर पोलिसांनी पल्लवीला काल अटक केली. यासंदर्भात गडचिरोली पोलिस ठाण्यात चौकशी केली असता पोलिसांनी अद्याप तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगितले तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रूडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.