Home Breaking News प्रेयसीने दिला नाही रिस्पान्स, प्रियकराने घेतला गळफास

प्रेयसीने दिला नाही रिस्पान्स, प्रियकराने घेतला गळफास

0
प्रेयसीने दिला नाही रिस्पान्स, प्रियकराने घेतला गळफास

प्रेयसीने दिला नाही रिस्पान्स, प्रियकराने घेतला गळफास

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : वाडी येथील आंबेडकरनगरातील एका तरुणाने प्रेयसी प्रेमाला प्रतिसाद न दिल्याने रागात येऊन आत्महत्या केल्याचे घटना सोमवारी (२६ एप्रिल) समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत युवक अनुप संजय वानखेडे (वय १९, रा. रमाबाई चौक, आंबेडकरनगर, वाडी) याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून, तो सध्या वाडी येथील एका गोडाऊनमध्ये काम करीत होता. मागील वर्षी एका कार्यक्रमात रिया (बदललेले नाव) नामक युवतीशी त्याची ओळख झाली होती. दोघांनी एकमेकांना मोबाईल क्र.ची देवाण घेवाण केली. तेव्हापासून त्याचे एकमेकांशी मोबाईलवरून सतत बोलणे, वॉट्स अँपवर संपर्क सुरू होता. दरम्यान, काही कारणावरून नुकतेच यांचे एकमेकांशी कशावरून तरी खटके उडू लागल्याने सदर युवतीने प्रतिसाद देणे थांबविले. ही बाब मनाला लावून मृतक अनुपने घटनेच्या आदल्या दिवशी अनुपने मोबाईलवर युवतीला व्हिडीओ कॉलिंग करून स्वत:चे डोके फोडण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली. मात्र, असे करूनही या आपल्या प्रेयसीने मनावर घेतले नाही.
प्रतिसाद ही दिला नाही, ही बाब मनावर घेऊन सोमवारी (२६ एप्रिल) सकाळी ११.३0 च्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी वरच्या माळ्यावरील सिलिंग पंख्याला दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. काही वेळाने ही बाब त्याच्या मित्राच्या लक्षात येताच ते घाबरले. त्यांनी त्याचे वडील संजय वानखेडे व परिवारातील इतर सदस्यांना याची माहिती दिली असता त्यांनी तातडीने त्याला खाली उतरविले. दुचाकीवर बसून रविनगर स्थित खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती वाडी पोलिस स्टेशनला होताच त्यांनी घटनास्थळ गाठून शवाला ताब्यात घेतले व उत्तरीय तपासणीकरिता मेयो रुग्णालयात पाठविले.
या घटनेनंतर मृत अनुपच्या आई-वडिलांनी शोकाकुल होऊन दोघांच्या प्रेमप्रकरणाबद्दल कुठलीच माहिती नसल्याचे सांगितले. नेहमीप्रमाणे मोबाईलवर बिझी राहत असेल, असे गृहीत धरून लक्ष दिले नाही. भावनेच्या भरात व अशा एकतर्फी प्रेमाने जीवन उद्धवस्त करणा-या घटनांपासून पालकांनी बोध घेणे व मुलांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे या घटनेवरून दिसून येते.